$type=ticker$snippet=hide$cate=0

येरवड्याच्या तुरुंगात आता जेल पर्यटन

पुणे/प्रतिनिधी : येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ’जेल पर्यटन’ सुरू करीत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या उपक्रमाचे उद्घ...

पुणे/प्रतिनिधी : येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ’जेल पर्यटन’ सुरू करीत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या उपक्रमाचे उद्घाटन करतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात राज्यात असलेल्या येरवडा आणि इतर तुरुंगांचे खूप महत्व आहे. अनेक ऐतिहासिक घटना येथे घडल्या आहेत. भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरू केला जात आहे. विद्यार्थी, इतिहास अभ्यासक आणि सामान्य नागरिकांना या उपक्रमात जेलमध्ये जाऊन ऐतिहासिक घटनांची माहिती घेता येईल. पहिल्या टप्प्यात येरवडा तुरुंगातून याची सुरुवात होणार आहे. शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत, या दृष्टिकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरू करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. 


येरवडा कारागृहापाठोपाठ राज्यातील इतरही कारागृहांमध्ये अशाच प्रकारे पर्यटन सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. या जेल पर्यटनाच्या माध्यमातून नागरिकांना येरवडा कारागृहाची सफर घडवण्यात येणार आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील मोठा भाग हा येरवडा कारागृहाशी जोडला गेला आहे. महात्मा गांधी यांच्यासह अनेक नेते स्वातंत्र्य चळवळीदरम्यान येरवडा कारागृहात बंदिस्त होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करारदेखील येरवडा कारागृहातच पार पडला होता. स्वातंत्र्यानंतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमधे दोषी ठरलल्या गुन्हेगारांना या कारागृहात फाशी देण्यात आली. देशाचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी असलेल्या जिंदा आणि सुखा यांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. मुंबई हल्ल्यातील दोषी पाकिस्तानी अतिरेकी अजमल अमीर कसाब यालाही येरवडा कारागृहातच फाशीवर लटकवण्यात आले. येरवडा कारागृहातील अशी ठिकाणी या कारागृह पर्यटनादरम्यान पाहता येणार आहेत. त्यासाठी तुरुंग प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना करण्यात येणार आहे. एकावेळी 50 व्यक्तींना या कारागृह पर्यटनासाठी तुरुंगामध्ये सोडण्यात येईल. त्यासाठी किमान सात दिवस आधी इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने किंवा येरवडा कारागृहाच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षपणे बुकिंग करावे लागणार आहे. या कारागृह पर्यटना दरम्यान कोणतीही वस्तू, मोबाईल किंवा कॅमेरा आतमध्ये नेता येणार नाही; मात्र आतमध्ये गेलेल्या पर्यटकांचे फोटो काढण्याची सोय करण्यात येणार असून आतमध्ये काढलेले फोटो पर्यटकांना नंतर पुरवण्यात येणार आहेत. 

Name

] ब्रेकिंग,862,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,5,Latest News,5780,letest News,599,Loksabha-2019,164,Maharashtra,211,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,156,satara.,4,solapur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10372,औरंगाबाद,366,क्रीडा,678,दखल,710,देश,4457,नाशिक,805,पुणे,753,बीड,1438,बुलडाणा,28,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16531,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13777,महाराष्ट्र सातारा,42,मुंबई,3734,विदेश,655,संपादकी,2,संपादकीय,1560,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: येरवड्याच्या तुरुंगात आता जेल पर्यटन
येरवड्याच्या तुरुंगात आता जेल पर्यटन
https://static.toiimg.com/photo/imgsize-42344,msid-60846809/60846809.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_537.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_537.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content