अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मु़ख्य आरोपी, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठेच्या स्टँडि...
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मु़ख्य आरोपी, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ बोठेच्या स्टँडिग वॉरंटसाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जर न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मान्य केला, तर वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांना राज्यासह इतर राज्यांतही त्याचा शोध घेण्यास मदत होणार आहे
जरे यांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी बाळ बोठेला अद्याप अटक झालेली नाही. त्याविरोधात अहमदनगरमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी या विरोधात अहमदनगर शहरात कँडल मार्च काढण्यात आला. या वेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही करण्यात आली. नगरमधील विविध स्वयंसेवी संघटनांनी हा कँडल मार्च काढला होता. बोठेचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता त्याच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल झाला आहे. आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिस सध्या बाळ बोठे याचा कसून शोध घेत आहेत. जरे यांची डायरी पोलिसांना मिळाली आहे. तिच्यात तो आणि जरे यांनी कुठे, केव्हा आणि कसा एकत्रित प्रवास केला, ते एकत्र कसे राहिले, याचा तपशील उपलब्ध असल्याची माहिती आहे. या डायरीचा तपासात काही उपयोग होतो का, याचा पोलिस शोध घेत आहे. बोठेच्या सहकार्यांच्या तपासातून पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.