म्हसवड / वार्ताहर : आगामी कालावधीत देवापूर ग्रामपंचायत निवडणुक निकालाप्रमाणेच सर्वत्र महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होईल, अशी खात्री माजी मुख्यमं...
म्हसवड / वार्ताहर : आगामी कालावधीत देवापूर ग्रामपंचायत निवडणुक निकालाप्रमाणेच सर्वत्र महाआघाडीचा प्रयोग यशस्वी होईल, अशी खात्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
देवापूर ग्रामपंचायतीची नुकतीच झालेली निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढविली. या निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलने भाजपा विचारसरणीच्या पॅनेलचे नऊ शुन्यने पानिपत केले. देवापूर येथील निवडून आलेले नऊ सदस्य व गावातील प्रमुख मान्यवरांनी नुकतीच कराड येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले राज्य स्तराप्रमाणेच स्थानिक पातळीवर सुध्दा महाआघाडीचा प्रयोग गरजेचा असून देवापूर ग्रामस्थांनी तो यशस्वी केला आहे. यापुढेही अशीच एकजूट दाखवा. विकासकामासाठी पाहिजे तेथे ताकद देण्याची ग्वाही आ. चव्हाण यांनी दिली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य व प्रमुख मान्यवरांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला. देवापूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी ताकद देण्याचे आवाहन प्रा. विश्वंभर बाबर यांनी आ. चव्हाण यांच्याकडे केले.
यावेळी नव्याने निवडून आलेल्या सर्व सदस्यांसह नानासाहेब चव्हाण, आनंदराव बाबर, रामदास बाबर, ज्ञानदेव बाबर, राजाराम बाबर, अरुण सावंत, बाबासाहेब बनसोडे, शहाजी बाबर, तात्यासाहेब औताडे, जगन्नाथ चव्हाण, संदीप चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.