गुत्तेदाराने 21लक्ष रूपये थकल्याने,दहा महिन्यांपासून काम बंद आष्टी। प्रतिनिधीः- आष्टी शहरात सन.2020 च्या सुरूवातीला बस स्थानकाच्या नविन इम...
गुत्तेदाराने 21लक्ष रूपये थकल्याने,दहा महिन्यांपासून काम बंद
आष्टी। प्रतिनिधीः- आष्टी शहरात सन.2020 च्या सुरूवातीला बस स्थानकाच्या नविन इमारतीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली होती.अंदाजे दोन कोटी रूपये खर्चून आष्टी बसस्थानकाची नविन इमारत उभी राहात आहे.या इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर ते फाऊडेशन लेवलपर्यत आले आहे.झालेल्या कामाचे संबंधित गुत्तेदाराला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने पैसे न दिल्याने काम बंद ठेवले आहे.गुतत्तेदाराचे 21 लक्ष रूपये थकित असल्याने गेल्या दहा महिन्यांपासून नविन बस स्थानक इमारतीचे काम बंद आहे.
आष्टी शहराला मराठवाड्याचे प्रवेशव्दार संबोधले जाते.त्यामुळे आष्टी येथील बस स्थानकातुन दररोज शेकडो बस आणि हजारो प्रवासी प्रवास करतात.या बस स्थानकातुन अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात.माञ या बसस्थानकाच्या इमरातीची दुरूस्त झाली असुन येथे प्रवाशांना कोणत्याच मुलभुत सुविधा मिळत नाही.घराची कळा अंगण सांगते.त्या प्रमाणे शहराची कळा बस स्थानक सांगते. तालुका आष्टी बसस्थानकात महिलांना शौचालय नाही,असे असले तरी केंद्र सरकार म्हणते शौचालय बांधा आणि उघड्यावर जाऊ नका परंतु आष्टी बस स्थानकात अनेक वर्षापासून शौचालय नसल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे प्रवासी व समाजसेविका प्रतिभाताई जोगदंड म्हणतात. गेल्या वर्षभरात नगरपंचायतने आष्टी शहरात अमुलाग्र बदल केले असल्याचे शहराची शोभा वाढली आहे.आष्टी शहरात विकास होण्यास सुरूवात झाली त्याच काळात म्हणजे सन.2020 च्या सुरूवातीलाच आष्टी शहरातील बस स्थानकाच्या नविन इमारतीसाठी महाराष्ट्र परिवहन मंडळाने दोन कोटी रुपयांची निधी मंजूर केला.त्यानुसार बस स्थानकाच्या नविन इमारतीचे काम देखील सुरू झाले. पायाभरणी होऊन कॉलम टाकण्या प्रक्रिया पर्यंत हे काम येऊन पोहोचले.दरम्यान कोरोना लाट आली आणि बरेच काही बदल झाले.विरोधामुळे बस स्थानकाच्या नविन इमारतीचे पुढचे काम बंद झाले.लॉकडाऊन मधुन काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानंतर बस स्थानकाच्या इमारतीचे काम सुरू होईल अशी अपेक्षा होती.परंतु परिवहन महामंडळाकडून संबंधित काम करणार्या एजन्सीला झालेल्या कामाचे 21 लक्ष रूपये दिले नाहीत.त्यामुळे हे काम अद्यापर्यंत बंद आहे.लॉकडाऊन मुळे काही काळ एसटी महामंडळाने आपल्या सर्व गाड्या बंद ठेवल्या होते.अशा परिस्थितीत कर्मचार्यांना पगार द्यावे लागल्याने मंडळाची आर्थिक परिस्थिती हलकीची झाली आहे.त्यामुळे बस स्थानकाच्या नविन इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.या कामासाठी लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी आष्टी तालुक्यातील प्रवासी व शहरवासीयांकडून होत आहे. गेल्या दहा महिन्यांपासून आष्टी येथील बस स्थानकाच्या नविन इमारतीचे बांधकाम बंद आहे. या कामासाठी खासदार, आमदार आणि पालकमंञी यांनी लक्ष घालुन हे काम पुर्ण करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरीक आणि प्रवाशांकडून होत आहे. नविन बसस्थानक परिसरात घाणीचे सामराज्य निर्माण झाले आहे.येथील नागरिकांना आणि व्यापार्यांना या घाणीचा ञास सहन करावा लागत आहे. परिसरात घाणीचे सामराज्य निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाला आहे.
महामंडळाकडे निधीच नाही
कोरोनाच्या महामारामुळे पाच-सहा महिने महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या सर्वच बस सेवा बंद होत्या. त्यामुळे मंडळाचे उत्पन्न पुर्णपणे बंद होते.अशा परिस्थितीत कर्मचार्यांना पगार द्यावे लागल्याने महामंडळाची तिजोरी रिकामी झाली आहे. काही महिन्यांपासून बस सेवा सुरू झाली असली तरी बसने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या घटली आहे.त्यातच डिजेलचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.त्यामुळे मंडळाकडे नविन कामे पुर्ण करण्यासाठी पुरेसा निधी नाही.
अनिल माने, प्रभारी विभागीय अभियंता,