$type=ticker$snippet=hide$cate=0

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यात अतिदक्षता

 मुंबई/प्रतिनिधी : नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाल्याच्या घटनेने दिल्लीसह देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दिल्ली येथील स्फोट...

 मुंबई/प्रतिनिधी : नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाल्याच्या घटनेने दिल्लीसह देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दिल्ली येथील स्फोटानंतर मुंबईत ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट केले असून त्यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. 


मुंबईत ज्या ज्या ठिकाणी इस्त्रायली बांधव राहतात, तिथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कुलाबा येथील नरीमन हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणत ज्यू लोक राहतात. याच ठिकाणी 26/11 चा हल्ला झाला होता. त्यानंतर या विभागात पोलिस सुरक्षा लावलेली असतेच; मात्र दिल्ली येथील स्फोटानंतर या ठिकाणी सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोलिसांची विशेष तुकडी दाखल झाली आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येणार्‍या सर्व मार्गांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून धावणार्‍या प्रत्येक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. आठ पोलिसांचे एक अशी सहा पथके मुंबईतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक एक्सप्रेसमध्ये जाऊन तपासणी करत आहेत. दरम्यान, या स्फोटाच्या घटनेनंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर पवार यांनी ट्वीट केले असून त्यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. पवार यांनी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले. राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीचे पोलिस आयुक्त एसएन श्रीवास्तव म्हणाले, की राजेश पायसट मार्क येथे हा स्फोट झाला, ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे. दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी भारतावर पूर्ण विश्‍वास दाखवला आहे. भारत इस्त्रायलच्या नागरिकांची पूर्ण सुरक्षा करेल, असे त्यांनी म्हटले आहे.


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5734,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,187,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,124,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10277,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,700,देश,4419,नाशिक,802,पुणे,724,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16302,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13521,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3663,विदेश,650,संपादकीय,1540,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यात अतिदक्षता
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यात अतिदक्षता
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/whatsapp-image-2021-01-24-at-7.16.48-pm_202101550168.jpeg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_567.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_567.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content