इस्लामपूर / प्रतिनिधी : नेर्ले परिसरातील महामार्गाच्या पश्चिमेला व फकिरागडाच्या उत्तरेला असणार्या कदम वस्तीच्या घोल परिसरात बिबट्याचा ...
इस्लामपूर / प्रतिनिधी : नेर्ले परिसरातील महामार्गाच्या पश्चिमेला व फकिरागडाच्या उत्तरेला असणार्या कदम वस्तीच्या घोल परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. बिबट्या सदृश्य प्राण्याने चार कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर, वनपाल अमोल शिंदे, अमोल साठे, वनरक्षक रायान्ना पाटोळे यांच्यासह वनखात्याचे अधिकारी यांनी घोल परिसरात चाचपणी केली.
नेर्ले व परिसरात आठवड्यापासून महामार्गाच्या पश्चिमला कदमवस्ती जवळ घोल या ठिकाणी शेतकर्यांची शेती व दुभत्या जनावरांची वस्ती आहे. शेतकर्यांनी सांगितले की, उसाच्या शेतात बिबट्या व त्यांची पिल्ले राहत असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकरी सांगत आहेत. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मा
गणी वस्तीवरील ग्रामस्थांनी केली. यावेळी माजी सरपंच जयकर कदम, सतीश कदम, प्रदीप कदम, अभिजीत कदम, दिलीप कदम, प्रशांत कदम, प्रशांत कदम, विश्वास कदम, संभाजी कदम, अनिल कदम, शिवाजी कदम उपस्थित होते.
.................