$type=ticker$snippet=hide$cate=0

‘त्यां’ची झेप!

भारताच्या इतिहासात रणरागिणींचा इतिहास फार जुना आहे. राणी चेन्नमा, राणी दुर्गावती, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी प्रचंड पराक्रम...


भारताच्या इतिहासात रणरागिणींचा इतिहास फार जुना आहे. राणी चेन्नमा, राणी दुर्गावती, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी प्रचंड पराक्रम गाजवून शत्रूला सळो की पळो करून सोडले. या स्त्रियांनी जमिनीवरील लढाईत शत्रूशी दोन हात केले. आता मात्र भारतीय स्त्री शक्ती केवळ जमिनीवरील लढाईतच नव्हे तर आकाशातही शत्रूशी दोन हात करण्यास सज्ज झाली आहे.

 कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून, त्यात आता महिलाही आपली क्षमता दाखवून देण्यास सज्ज झाल्या आहेत. भारतमातेच्या लेकी आता राफेल विमानातून भरारी घेतील. अंबाला एअर फोर्स स्टेशन येथे संबंधित महिला वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या या महिला वैमानिक मिग-21 विमान चालवितात. प्रशिक्षणानंतर या महिला राफेल विमानांच्या 17 गोल्डन एरो स्क्वाड्रनमध्ये सहभागी होतील. दुसरीकडे भारतीय नौदलानेही सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रीतिसिंह या दोन महिला अधिकार्‍यांना प्रथमच युद्धनौकेवर तैनात केले आहे. आता या दोन्ही महिला अधिकार्‍यांना युद्धनौकेवरील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. युद्धनौकेवरून एअरबोर्न कॉम्बॅट स्वरूपाचे काम करणार्‍या महिला अधिकार्‍यांची ही पहिलीच बॅच आहे. लढाऊ विमानांमध्ये यापूर्वी महिलांना प्रवेश नव्हता. विशेषत: युद्धनौकांवरून उड्डाण करणार्‍या आणि नौकेवरच उतरणार्‍या विमानांमध्ये महिलांना संधी देण्यात आली नव्हती. भारतीय नौदलाच्या एकूण 17 अधिकार्‍यांच्या तुकडीत या दोन महिला अधिकार्‍यांचा आता समावेश आहे. यात चार महिला, भारतीय तटरक्षक दलाचे एकूण तीन अधिकारी, रेग्युलर बॅचचे 13 अधिकारी आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या एकूण चार महिला अधिकारीही सहभागी आहेत. त्याचप्रमाणे वायुदलात महिला अधिकार्‍यांची संख्या आता 1875 झाली आहे. यातील दहा महिला लढाऊ विमानांच्या वैमानिक आहेत, तर 18 महिला लेफ्टनंट आहेत. संरक्षण मंत्रालयाने शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील महिला अधिकार्‍यांना लष्कराच्या सर्व दहा शाखांमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती देण्यास मंजुरी दिली आहे. महिलेने एकटीने जबाबदारी पार पाडणे आणि सामूहिक जबाबदारी पार पाडणे यात फरक असतो. रेल्वे इंजिन चालक म्हणून महिलेने दोन दशकांपूर्वीच जबाबदारी निभावली होती. गेल्या आठवड्यात संपूर्ण मालगाडीचे नियंत्रण महिलांकडे होते. डहाणू ते वडोदरापर्यंत महिलांनी मालगाडी नेली, हा इतिहास पश्‍चिम रेल्वेने घडविला.

सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात निकाल देताना कॉम्बॅट ऑपरेशनपासून महिलांना दूर ठेवण्याचा सल्ला दिला होता. स्वयंपाकघरातून बाहेर पडून मुली आता रणभूमीपर्यंत आपली क्षमता आणि कौशल्य दाखवीत आहेत. भारतीय नौदलाने लैंगिक समानता कृतीतून दाखवून दिली आहे. सब लेफ्टनंट शिवांगी स्वरूप यांनी नौदलातील पहिली महिला वैमानिक बनण्याचा गौरव प्राप्त केला आहे आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कोची हवाई तळावर ऑपरेशन ड्युटीमध्ये त्या सहभागीही झाल्या आहेत. यापूर्वी 19 फेब्रुवारी 2018 रोजी भारतीय वायुदलातील फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी मिग-21 विमानातून भरारी घेऊन इतिहास रचला आहे. अवनी चतुर्वेदी यांनी गुजरातमधील जामनगर हवाई तळावरून मिग-21 लढाऊ विमानाचे एकटीने उड्डाण केले. अवनी यांच्याबरोबर मोहना सिंह आणि भावना कंठ यांनाही प्रथमच महिला पायलट म्हणून घोषित करण्यात आले आहे. लष्करात महिला नेतृत्व का करू शकत नाहीत, हा प्रश्‍नही अनेक वर्षांपूर्वीपासून उपस्थित करण्यात येत होता. विंग कमांडर अभिनंदन यांनी जेव्हा पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले, तेव्हा त्यांना मार्गदर्शन करणार्‍या अधिकारी मिंटी अग्रवाल याच होत्या. यापूर्वी मिताली मधुमिता यांनी काबुल येथील भारतीय दूतावासावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी पराक्रम दाखविला होता. कॅप्टन तान्या शेरगिल यांना प्रजासत्ताकदिनी झालेल्या परेडमध्ये सिग्नल कोअरच्या तुकडीचे नेतृत्व करताना देशवासीयांनी अभिमानाने पाहिले होते. महिलांनी पराक्रम केल्यानंतर लष्करातील अधिकार्‍यांची मानसिकताही बदलू लागली. काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या (एलओसी) अगदी जवळ दहा हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या साधना टॉपवरील मोर्चा महिला जवानांनी सांभाळलेला आहे. या सर्व महिला सैनिक आसाम रायफल्सच्या आहेत. म्यानमारच्या सीमेवर आणि ईशान्येकडील दहशतवादग्रस्त राज्यांमधील तैनातीचा त्यांना अनुभव आहे.

एअर इंडियाच्या महिला वैमानिकांचे एक पथक इतिहास रचण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या पथकाने अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथून बंगळूरसाठी उड्डाण केले. हे पथक बंगळूरला पोचले. हे काही सर्वसाधारण उड्डाण नव्हते. हे पथक उत्तर ध्रुवावरून उड्डाण करून आले. पहिल्यांदाच महिला वैमानिकाच्या नेतृत्वात केवळ महिला चालक दल असलेले एखादे उड्डाण उत्तर ध्रुवावरून जाणारे हे पहिलेच उड्डाण होते. या ऐतिहासिक उड्डाणाचा टेक ऑफदेखील समारोहासारखा साजरा करण्यात आला. नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांनीदेखील या समारोहाचे छायाचित्र शेयर केले आहे. आमच्या नारीशक्तीने ही प्रथम कामगिरी करत इतिहास रचला आहे. हे मंत्र्यांचे विधान खरेच आहे. विमान उत्तर ध्रुवावरून पुढे गेले आहे. कॅप्टन जोया अग्रवाल या ऐतिहासिक उड्डाणाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत सहवैमानिक असलेल्या कॅप्टन पापागरी तनमई, कॅप्टन आकांक्षा सोनवरे आणि कॅप्टन शिवानी मन्हास या आहेत. भारतीय महिलांच्या यशाच्या पेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे. एअर इंडियांच्या महिला वैमानिकांनी जगातील सर्वात लांब हवाई मार्ग असलेल्या उत्तर ध्रुवावरून उड्डाण घेऊन इतिहास रचला. त्यानंतर ही टीम उत्तर ध्रुवावरून बंगळूरला पोहोचली. या दरम्यान, महिला वैमानिकांच्या टीमने 16 हजार किलोमीटरचा पल्ला पार पाडला. या ऐतिहासिक उड्डाणाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. एअर इंडियाने स्वत: ट्विटरवरून या ऐतिहासिक उड्डाणाची माहिती दिली आहे. या पूर्वीही उत्तर ध्रुवावरून उड्डाण करण्यात आलेले आहे; पण संपूर्ण महिला टीमने केलेली ही पहिलीच कामगिरी आहे. भारताच्या मुलींनी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपासून ते भारताच्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंतची ऐतिहासिक उड्डाण घेतले. ‘राफेल’ या अत्याधुनिक लढाऊ विमानातून शत्रूवर हल्ला करण्यास आता भारताची ‘अग्निशिखा’ सज्ज झाली आहे. अग्निपंखाने सज्ज या रणरागिणीचे नाव आहे फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह. शिवांगीचा समावेश ‘17 गोल्डन ऍरो स्क्वॉड्रन’मध्ये लढाऊ वैमानिक (फायटर पायलट) म्हणून करण्यात आला आहे. ती भारतातील राफेल उड्डाण करणारी पहिली महिला लढाऊ वैमानिक ठरणार आहे. जगातील सर्वोत्तम श्रेणीच्या लढाऊ विमानांमध्ये राफेलचा समावेश होतो आणि या अत्याधुनिक विमानाची लढाऊ वैमानिक बनण्याचा मान मिळाल्याने शिवांगी सिंह सळसळत्या उत्साहाच्या तरुणाईचे प्रेरणास्रोत बनली आहे. समाज माध्यमांवर तिच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. हवाई दलाच्या ‘मिग 21 बायसन’च्या जागी राफेल तैनात होताच फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह आपल्या नव्या भूमिकेत दाखल होणार आहे.


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5568,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,13,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10020,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,666,देश,4188,नाशिक,779,पुणे,614,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15484,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12591,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3462,विदेश,637,संपादकीय,1475,सातारा,3166,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ‘त्यां’ची झेप!
‘त्यां’ची झेप!
https://1.bp.blogspot.com/-ky20rO71PXE/X_xHFqNdPeI/AAAAAAABm_o/If8DmkbFWoQAyKm9wHY6t1YlgAVwPY-ygCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-ky20rO71PXE/X_xHFqNdPeI/AAAAAAABm_o/If8DmkbFWoQAyKm9wHY6t1YlgAVwPY-ygCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_574.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_574.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content