शिर्डी/प्रतिनिधी : दिवाळीला शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे फटाके शिवाजी अमृतराव गोदकर यांनी फोडले, आता प्रतिक्षा होती ती उपनगराध्यक्...
शिर्डी/प्रतिनिधी : दिवाळीला शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे फटाके शिवाजी अमृतराव गोदकर यांनी फोडले, आता प्रतिक्षा होती ती उपनगराध्यक्ष पदाचे फटाके कोण फोडणार ? याची होती. जानेवारी-2021 या नववर्षाच्या प्रारंभी उपनगराध्यक्ष पदाचे फटाके सचिन उर्फ हरिश्चंद्र कोते यांनी फोडले असून, त्यांची शिर्डी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणार्या श्री साईबाबांच्या पवित्र साईनगरीच्या शिर्डी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक सचिन(हरिश्चंद्र) कोते यांची नुकतीच निवड झाली आहे. शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी काही दिवसांपूर्वीच आपला पदाचा राजीनामा दिला होता. नगराध्यक्षांनी तो जिल्हाधिकारी यांच्याकडे नगरला पाठविण्यात आला होता. त्यानंतर नगरहून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त उपनगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी सचिन उर्फ हरिश्चंद्र कोते यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला व त्यांची शुक्रवारी शिर्डी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, निवड झाल्यानंतर सचिन कोते यांची निवड झाल्याबद्दल उपस्थित नगरसेवक, न.पचे,अधिकारी यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी नगरसेवक तसेच अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.