$type=ticker$snippet=hide$cate=0

डेब्रिज टाकून कांदळवनाचे नुकसान करणार्‍यांवर होणार कारवाई

मुंबई : कांदळवनावर डेब्रिज टाकण्यासारखे प्रकार तसेच कांदळवनावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात. कांदळवनावर डेब्रिज...

मुंबई : कांदळवनावर डेब्रिज टाकण्यासारखे प्रकार तसेच कांदळवनावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात. कांदळवनावर डेब्रिज टाकून त्याचे नुकसान करुन पर्यावरणाची हानी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना मंत्री ठाकरे यांनी दिल्या.   


कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, कांदळवनाचे क्षेत्र हे संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करणे, अधिसूचित करणे याअनुषंगाने आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कांदळवनाचे एपीसीसीएफ विरेंद्र तिवारी, सीसीएफ (मंत्रालय) अरविंद आपटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले की, पर्यावरण रक्षणाच्या प्रक्रियेत कांदळवनाचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महसूल, वन, पर्यावरण आदी संबंधित विभागांनी राज्यातील कांदळवन क्षेत्र संरक्षित करणे, अधिसूचीत करणे यासाठी समन्वयाने काम करावे. कांदळवनाचे नुकसान करणारे घटक, त्यावर डेब्रीज टाकून कांदळवन नष्ट करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कांदळवनाचे अतिक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे किंवा या क्षेत्राचे फेन्सिंग करणे, संरक्षणासाठी सीसीटीव्हीसारख्या यंत्रणांचा वापर करणे, वन कर्मचार्‍यांना आवश्यक सेवा-सुविधा देणे आदी उपाययोजनांवर भर देण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. फेब्रुवारी 2021 च्या मध्यापर्यंत 6 हजार 500 हेक्टर क्षेत्रावरील कांदळवन राखीव वन म्हणून अधिसूचीत होणे अपेक्षित राज्यातील कांदळवन हे वन क्षेत्र म्हणून संरक्षित आणि अधिसूचीत करण्यासाठी मंत्री श्री. ठाकरे हे वेळोवेळी बैठका घेऊन यासाठी पाठपुरावा करीत आहेत. याचा परिणाम म्हणून डिसेंबर 2019 पासून आतापर्यंत भारतीय वन कायद्याच्या सेक्शन 4 खाली 1 हजार 387 हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच या कायद्याच्या सेक्शन 20 खाली 1 हजार 575 कांदळवन हे राखीव वन म्हणून अंतिमत: अधिसूचित करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2021 च्या मध्यापर्यंत सुमारे 6 हजार 500 हेक्टर क्षेत्रावरील कांदळवन हे राखीव वन क्षेत्र म्हणून अधिसूचीत होणे अपेक्षित आहे, अशी माहिती यावेळी संबंधित अधिकार्‍यांमार्फत देण्यात आली.


Name

] ब्रेकिंग,875,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5955,letest News,602,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,383,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,79,satara,281,satara.,7,solapur,1,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10821,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,743,देश,4589,नाशिक,827,पुणे,850,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17411,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,171,महाराष्ट्र,14719,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4133,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1630,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: डेब्रिज टाकून कांदळवनाचे नुकसान करणार्‍यांवर होणार कारवाई
डेब्रिज टाकून कांदळवनाचे नुकसान करणार्‍यांवर होणार कारवाई
https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/21/2_09_39_47_mangrove-_1_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_590.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_590.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content