$type=ticker$snippet=hide$cate=0

मुंबईला तोडण्याचा काँग्रेसचा डाव

भाजपचा आरोप; पालकमंत्र्यांच्या दोन आयुक्तांच्या मागणीवरून वाद मुंबई / प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणार...

भाजपचा आरोप; पालकमंत्र्यांच्या दोन आयुक्तांच्या मागणीवरून वाद

मुंबई / प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त करण्याची मागणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी नगर विकास विभागाकडे केली. त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपने तर काँग्रेसला मुबई तोडायची आहे, असा आरोप केला आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचाच परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणार्‍या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते; परंतु सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्‍न दीर्घकाळ प्रलंबित राहतात, असे त्यांनी म्हटले आहे. उपनगरात राहणार्‍या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयात यावे लागते नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणे गरजेचे आहे. पी-उत्तर वॉर्डच्या विभाजनास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिल्यानंतर आता पालिकेसाठीही दोन आयुक्त असावेत, अशी मागणी त्यांनी केली. सध्या मुंबई शहर व उपनगरसाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. याच पार्श्‍वभूमीवर दोन आयुक्तांची पदे निर्माण करावीत, अशी मागणी शेख यांनी आहे. भाजपने त्यावर टीका केली आहे. शेख यांची मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी करणे अत्यंत निंदनीय असून, या आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे षड्यंत्र पुन्हा एकदा उघड झाले आहे, अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. शेख मागील 11 वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत असलेल्या मालाडमधील नागरिकांना महानगरपालिकेच्या संदर्भातील कामे करण्यासाठी होत असलेली अडचण दूर व्हावी या करिता कधीही प्रयत्न करावेसे वाटले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा जो डाव आहे तो भारतीय जनता पक्ष कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास मुंबई भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भातखळकर यांनी दिला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या नावाने कायमच राजकारण करणार्‍या शिवसेनेची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असलम शेख यांच्या या वक्तव्याविषयीची भूमिका काय आहे, असा प्रश्‍न भातखळकर यांनी विचारला आहे.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5567,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,12,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10020,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,665,देश,4188,नाशिक,779,पुणे,614,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15484,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12590,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3462,विदेश,637,संपादकीय,1472,सातारा,3166,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुंबईला तोडण्याचा काँग्रेसचा डाव
मुंबईला तोडण्याचा काँग्रेसचा डाव
https://s3.india.com/wp-content/uploads/2017/04/BJP-Congress-2.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_594.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_594.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content