नवी दिल्ली : संसदेचे या दशकातले हे पहिले अधिवेशन सुरु होत आहे. भारताच्या उज्वल भविष्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या ध...
नवी दिल्ली : संसदेचे या दशकातले हे पहिले अधिवेशन सुरु होत आहे. भारताच्या उज्वल भविष्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या धेय्याने झपाटलेल्या सर्वांनी जी स्वप्ने पाहिली, ती स्वप्ने, ते संकल्प वेगाने साकारण्यासाठी ही सुवर्ण संधी देशाकडे आली आहे. या दशकाचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी या सत्रात संपूर्ण दशक लक्षात घेऊन चर्चा व्हाव्यात, सर्व प्रकारचे विचार मांडले जावेत आणि विचार मंथनातून अमृत प्राप्ती व्हावी अशी देशाची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जे आज, शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शुभारंभाच्या निमित्ताने बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या कोट्यवधी जनतेने
ज्या आशा-अपेक्षांसह आपल्याला संसदेत निवडून दिले आहे, त्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी, संसदेच्या या पवित्र स्थानाचा उपयोग करत, लोकशाहीच्या सर्व मर्यादांचे पालन करत, आपले योगदान देण्यात आपण मागे राहणार नाही याचा मला विश्वास आहे. सर्व खासदार हे सत्र अधिक उत्तम करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.हे अर्थसंकल्पीय अधिवेशनही आहे. भारताच्या इतिहासात कदाचित हे प्रथमच घडले असेल की 2020 मध्ये एक नव्हे तर वित्त मंत्र्यांना वेगवेगळ्या पॅकेजच्या स्वरुपात एका प्रकारे चार- पाच छोटेखानी अर्थसंकल्प द्यावे लागले. म्हणजेच 2020 मध्ये एका प्रकारे या छोटेखानी अर्थसंकल्पांची मालिका सुरूच राहिली. या अर्थसंकल्पाकडेही त्या चार-पाच छोटेखानी अर्थसंकल्पांतली मालिका म्हणूनच पहिले जाईल याचा मला विश्वास आहे. आदरणीय राष्ट्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली, संसदेच्या दोन्ही सदनाच्या खासदारांसह त्यांचा संदेश पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.