$type=ticker$snippet=hide$cate=0

कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात ’राजभवनाला घेराव’ घालणार ः थोरात

मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. हे कृषी कायदे रद्द करावेत या मा...


मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. हे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर जवळपास मागील 45 दिवसांपासून लाखो शेतकरी हाडं गोठवणार्‍या थंडीत ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आतापर्यंत 60 पेक्षा जास्त शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते 16 जानेवारीला नागपूर येथील ’राजभवनला घेराव’ घालणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 


यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार निवडक उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असून या सरकारला देशातील गोरगरीब जनता शेतकरी, कामगार यांचे काही देणे घेणे नाही. केंद्र सरकारने संसदेच्या नियमांना पायदळी तुडवून आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकर्‍यांना उद्धवस्त करणारे आहेत. भांडवलदारांच्या हिताचे हे कायदे तात्काळ रद्द करावेत ही शेतकर्‍यांची भूमिका योग्य असून काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकर्‍यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून निर्दयी केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूट सुरु आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी 16 जानेवारी रोजी नागपूर येथे आंदोलन केले जाणार आहे. शेतकर्‍यांबरोबर मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचा उद्योग सुरु केला आहे. पेट्रोल डिझेलमध्ये सतत दरवाढ करु नफेखोरी केली जात आहे. इंधन दरवाढीने 73 वर्षातील उच्चांक गाठला आहे. मे 2014 मध्ये पेट्रोलवर असलेली 9.20 रुपये एक्साईज ड्युटी वाढवून मागील सहा वर्षात मोदी सरकारने 32.98 रुपये केली आहे, लिटरमागे 23.78 रुपयांची वाढ म्हणजे तब्बल 258 टक्के वाढ तर डिझेलची मे 2014 मध्ये असलेली 3.46 रुपये एक्साईज ड्युटी आज 31.83 रुपये केली म्हणजे प्रति लिटर 28.37 रुपये आणि 820 टक्क्यांची वाढ. विशेष म्हणजे जगात क्रूड ऑईलचे दर 110 डॉलर प्रति बॅरलवरून 50 डॉलर प्रति बॅरल एवढे घसरलेले असताना ही इंधन दरवाढ केली जात आहे. इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आतापर्यंत 19 लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोक व शेतकरी यांच्यावरच होत आहे. शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्‍नी काँग्रेस पक्ष नेहमीच उभा राहिला असून 16 जानेवारीला ’किसान अधिकार दिवस’ पाळत आंदोलन केले जात आहे. भाजपच्या मनमानी कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे. लोकशाही मूल्ये व संविधानाला पायदळी तुडवत लहरी कारभार सुरु आहे. काँग्रेस पक्ष या जुलमी सरकारविरोधात याआधीही रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. हे काळे कायदे केंद्र सरकार रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहू, असेही थोरात म्हणाले.


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5763,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,197,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,38,satara,141,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10326,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,705,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16426,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13666,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3703,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1550,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात ’राजभवनाला घेराव’ घालणार ः थोरात
कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात ’राजभवनाला घेराव’ घालणार ः थोरात
https://images.indianexpress.com/2019/07/thorat.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_605.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_605.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content