वॉशिंग्टन: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाउसमध्ये प्रसाधनगृहाच्या नुतनीकरणासाठीतब्बल १.२ दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास...
वॉशिंग्टन: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाउसमध्ये प्रसाधनगृहाच्या नुतनीकरणासाठीतब्बल १.२ दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास ९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या मुद्यावर बायडन विरोधकांच्या निशाण्यावर आले असून हा खर्च म्हणजे करदात्यांच्या पैशांचा चुराडा असल्याची टीका करण्यात येत आहे.
हे प्रसाधनगृह फर्स्ट लेडीच्या वापरासाठी असल्याचे म्हटले जात आहे. या प्रसाधनगृहाचे नुतनीकरणाचे काम फर्स्ट लेडीच्या कार्यालयाजवळ करण्यात येत आहे. या प्रसाधनगृहाच्या बांधकामाबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. हे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. याआधी जो बायडन व्हाइट हाउसमध्ये येण्याआधी साफसफाईसाठी एक लाख २७ हजार डॉलर मंजूर करण्यात आले होते.