ब्रिस्बेन : अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याचा मोह रोहित शर्मा आवरू शकला नाही. आणि त्याचे पर्यवस...
ब्रिस्बेन : अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याचा मोह रोहित शर्मा आवरू शकला नाही. आणि त्याचे पर्यवसान त्याला विकेट गमवावी लागली. रोहित ४४ धावांवर माघारी परतला आणि नेटिझन्सनी त्याच्या बेजबाबदार फटक्याचा समाचार घेतला.
शुबमन गिल व रोहित यांनी सावध सुरुवात केली. पण, गिल माघारी परतला. रोहित व चेतेश्वर पुजारा ही जोडी चांगलीच जमली होती. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. लियॉनचा चेंडू सीमापार मारण्याच्या प्रयत्नात मिचेल स्टार्कच्या हाती झेल देऊन रोहित माघारी परतला. त्यानं ७४ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. त्याच्या या फटक्यावर आजी-माजी खेळाडू खवळले. दरम्यान पावसामुळे खेळ थांबवावा लागला आणि तेव्हा टीम इंडियानं 2 बाद 62 धावा केल्या होत्या.