भुवनेश्वरः ओडिशा राज्यातील रुरकेला पोलाद प्रकल्पात विषारी वायूची गळती झाली. यामध्ये चार कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला असून इतर सहा जणांची...
भुवनेश्वरः ओडिशा राज्यातील रुरकेला पोलाद प्रकल्पात विषारी वायूची गळती झाली. यामध्ये चार कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला असून इतर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकल्पातील कोल केमिकल युनिटमध्ये बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, या पोलाद प्रकल्पातील कोल केमिकल युनिटमध्ये कामगार दुरुस्तीचे काम करत होते, या वेळी ही दुर्घटना घडली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रकल्पाच्या अधिकर्यांनी दिली.
गणेशचंद्र पलिया (वय 59), अभिमन्यू साहू (वय 33), रबिंद्र साहू (वय 59) आणि ब्रह्मानंद पांडा (वय 51) अशी
मृत कामगारांची नावे आहेत. मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्टर स्टार कन्स्ट्रक्शन कंपनीने या कंत्राटी कामगारांना या प्रकल्पात दुरुस्तीच्या कामासाठी आणले होते, असे प्रकल्पाच्या अधिकार्यांनी सांगितले.