चार किलो गांजासह दुचाकीस्वार पोलिसांच्या ताब्यात दिपक मदने / फलटण / प्रतिनिधी : फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीत फलटण-लोणंद रोडवर जिंती नाका ...
चार किलो गांजासह दुचाकीस्वार पोलिसांच्या ताब्यात
दिपक मदने /
फलटण / प्रतिनिधी : फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीत फलटण-लोणंद रोडवर जिंती नाका येथे फलटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किंद्रे, सपोनि गायकवाड, सपोफो भोईटे, पो. ना. लावंड, हवालदार ठाकूर, पो. ना. सूळ, पो. कॉ. मेंगावडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे जिंती नाका येथे सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास लोणंद कडून फलटणच्या दिशेने येणार्या संशयितास चार किलो गांजासह अटक केली.
फलटण पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संशयित होंडा शाईन मोटरसायकलवरून निघाला होता. पोलिसांनी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला थांबून नाव व पत्ता विचारला असता त्याचे नाव युवराज बाळू मोरे (वय 32, रा. कुंभार गल्ली, मलटण, ता. फलटण, जि. सातारा) संशयाची झडती घेतली असता त्याच्या जवळील पिशवीमध्ये 12 हजार 300 रुपये किमतीचा 4 किलो गांजा, मोटारसायकल, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 65 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताविरोधात सपोनि एन. आर. गायकवाड यांनी फलटण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार आंमली पदार्थाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करत आहेत.