मुंबई/प्रतिनिधीः बॉलिवूड क्वीन कंगणा राणावत हिने मणिकर्णिका चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा नुकतीच केली आहे. ’पंगा गर्ल’ लवकरच ’मणिकर्णिका र...
मुंबई/प्रतिनिधीः बॉलिवूड क्वीन कंगणा राणावत हिने मणिकर्णिका चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा नुकतीच केली आहे. ’पंगा गर्ल’ लवकरच ’मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिद्दा’ या चित्रपटात दिसणार आहे. मणिकर्णिकामध्ये कंगणाने झाशीच्या राणीची भूमिका निभावली आहे; पण मणिकर्णिकाच्या पुढील भागात कंगणा काश्मीरची राणी ’दिद्दा’ची भूमिका निभावणार आहे; पण चित्रपटाच्या घोषणेनंतर कंगणावर चोरीचा आरोप झाला आहे. कंगणाने या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप ’दिद्दा’चे लेखक आशिष कौल यांनी केला आहे.
कौल यांनी कंगना राणावत हिच्यावर कॉपीराइटचा आरोप केला आहे. ते म्हणाले, की स्वतः च्या हक्कांसाठी संघर्ष करणारी कंगणा माझ्यासारख्या लेखकाच्या हक्कांचे उघडपणे उल्लंघन करत आहे. कंगणाने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले असून हे बेकायदेशीर आहे. मला कंगणाचे वागणे समजले नाही. मी याला बौद्धिक चोरी म्हणेल. कंगणा हा दावा करू शकते, की ’दिद्दा’ हे एक ऐतिहासिक पात्र आहेच परंतु दिद्दाबद्दल जगातील कोणत्याही इतिहासकारांनी फारसे काही लिहिले नाही. याला फक्त अपवाद फक्त इतिहासकार कल्हान आहेत. इतर कोणत्याही इतिहासकाराने काश्मीरची राणी दिद्दावर मोजून दोन पानेही लिहिली नाहीत. या विषयावर मी सहा वर्षे संशोधन करून ही माहिती जमवली आहे. कंगणाने गुरुवारी ’मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा’ हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. कंगणा हा चित्रपट फिल्म निर्माते कमल जैन यांच्यासोबत बनवणार आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले होते, की आपला भारतवर्ष झाशीच्या राणीसारख्या कित्येक बहाद्दूर महिलांच्या कथेचा साक्षीदार राहिला आहे. अशीच आणखी एक वीरांगना म्हणजे काश्मीरची राणी दिद्दा, जिने महमुद गजनवीला एकदा नव्हे, तर दोनदा पराभूत केले आहे.