परभणी,/प्रतिनिधी : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती अभियान पंधरवाडयाचे आयोजन जिल्हा प्रशासन, ग्राहक संरक्षण परिषद व अ.भा.ग्राहक प...
परभणी,/प्रतिनिधी : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागृती अभियान पंधरवाडयाचे आयोजन जिल्हा प्रशासन, ग्राहक संरक्षण परिषद व अ.भा.ग्राहक पंचायतच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता जिल्हयात ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्यावतीने दिपोत्सव साजरा करून करण्यात आली.
24 डिसेंबर हा दिवस देशात ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने अ.भा.ग्राहक पंचायतचयवतीने 15 ते 30 च्या दरम्यान ग्राहक जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात जिल्हयातील सर्व तालुकयातून वेगवेगळया प्रको उप्रकम राबविण्यात आले त्यात अ.भा.ग्राहक पंचायत परभणी तालुक्याचे सहसचिव योगीराज वाकोडे यांनी ताडलिंमला या गावी जागतिक ग्राहक दिन पंधरवाडानिमित्त कार्यक्रम घेतला. यात जिल्हा परिषदेचे शिक्षक अमोल देसाई, शिवा लोंढे, मिरा वाकोडे, व्यंकट भालेराव, शांतीकुमार यांनी सहभाग नोंदविला. पालम या ठिकाणी प्रा.निर्वळ सर यांच्या निवासस्थानी दिपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. जिंतूर या ठिकाणी तालुकाध्यक्ष गुलाबराव शिंदे, सदस्य संपतराव ठोंबरे, ज्ञानेश्वर राठोड, अनुरत आजुरे, कोंडीबा सानप, कमलाबाई कांबळे यांनी दिपप्रज्वलनाचा कार्यक्रम घेतला. तसेच पालम शाखेच्यावतीने दिपोत्सवाने सांगता करण्यात आली. त्याप्रसंगी लिंबाजी टोले, प्रा.डॉ.कालिदास गुडदे, प्रा.डॉ.गोर्वधन उरकुडे, प्रा.डॉ.सुखदेव चव्हाण, प्रा.डॉ.मोहन डमरे, प्रा.सुर्वे सर, प्रा.उध्दव निर्वळ उपस्थित होते. अ.भा.ग्राहक पंचायत सेलूच्यावतीने दिपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. व ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र सुरू करण्यात आले. परभणी अ.भा.ग्राहक पंचायतच्यावतीने स्वामी विवेकानंद व भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करून दिपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा संघटक धाराजी भुसारे, जिल्हा उपाध्यक्षा राजश्री थोरात, जिल्हा सचिव डॉ.संदीप चव्हाण, जिल्हा सदस्य के.बी.शिंदे, परभणी तालुकाध्यक्ष अब्दुल रहिम, परभणी तालुका उपाध्यक्ष विजय चट्टे, तालुका सचिव योगीराज वाकोडे, अनिल दहिवाळ, बाबासाहेब भोसले, लक्ष्मण पवार उपस्थित होते. पंधरवाडा अभियानाची सांगता मुख्य कार्यक्रम अ.भा.ग्राहक पंचायत संचलित ग्राहक मार्गदर्शन केंद्र जिल्हा कार्यालय परभणीच्यावतीने 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी सात वाजता दिपोत्सव साजरा करून केक कापून नवीन कायद्याचे स्वागत करण्यात आले. मुख्य समारंभास डॉ.विलास मोरे देवगीरी प्रांत संघटक तथा परभणी जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहूणे सेलू येथील प्रतिष्ठीत व्यापारी मेहता हे होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक जिल्हा संघटक धाराजी भुसारे यांनी केले. तर सुत्रसंचालन पालम तालुकाध्यक्ष जयवंतराव गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे स्वागत परभणी तालुकाध्यक्ष अब्दुल रहीम यांनी केले. तर आभार परभणी तालुकाध्यक्ष विजय चट्टे यांनी मानले. यावेळी अभियानासंदर्भात जिल्हा उपाध्यक्षा राजश्री थोरात, जिल्हा सचिव संदीप चव्हाण, जिल्हा सदस्य के.बी.शिंदे, कमलताई राठोड, महानंदा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परभणी तालुका सहसचिव योगीराज वाकोडे, सदस्य बाबासाहेब भोसले, लक्ष्मण पवार यांनी प्रयत्न केले. जिल्हयात सर्व तालुका कार्यकारिणी व ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्यावतीने नवीन कायद्याचे स्वागत दिपोत्सव करून ग्राहक जागृृती अभियानाची सांगता करण्यात आली.