$type=ticker$snippet=hide$cate=0

दहशतवाद्यांवर ‘ना’पाक कारवाई

पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोसणारी भूमी आहे, हे वेगळं सांगायला नको. अमेरिका, सौदी अरेबियासारख्या देशांतून पाकिस्ताननं गरीबी निर्मूलन व अन्य ...

पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोसणारी भूमी आहे, हे वेगळं सांगायला नको. अमेरिका, सौदी अरेबियासारख्या देशांतून पाकिस्ताननं गरीबी निर्मूलन व अन्य कारणांसाठी अब्जावधी डॉलर आणले; परंतु या मदतीचा वापर दहशतवादासाठी केला. जगानं वारंवार सांगूनही दहशतवादाची पाळमुळं खणून काढायला पाकिस्ताननं कधीच प्राधान्य दिलं नाही. आता नाकातोंडाशी आल्यानं पाकिस्तान किमान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचं नाटक करतो आहे.

जगात कुठंही काही झालं, त
री बोट पाकिस्तानकडं दाखविलं जायचं, इतकं दहशतवाद आणि पाकिस्तानचं नात आहे; परंतु गेल्या काही दिवसांतील बातम्या पाहिल्या,तर कुणालाही पाकिस्तान दहशतवाद्यांवर किती कठोर कारवाई करतो, असं जगाला वाटण्याचा संभव आहे; परंतु वास्तवात हा तसा आभास आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे, हे दाखविण्यासाठी पाकिस्तानात सध्या एकामागून एका दहशतवाद्याला शिक्षा करण्याचं किंवा त्यांच्या अटकेचे आदेश दिले जात आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करतो; परंतु जग मात्र संशयानं पाकिस्तानकडं पाहते, असा कुणाचाही समज होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानच्या नाड्या पुरत्या आवळल्या गेल्यानं त्याला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचं किमान जगाला दाखवावं लागतं आहे. एकीकडं आम्ही दहशतवाद्यांना पाठीशी घालत नाही, असं म्हणायचं, दुसरीकडं पुलवामासारख्या दहशतवादी घटना घडवून आणायच्या, बालाकोटच्या हवाई हल्ल्यात कुणीही ठार झालं नाही, असं म्हणायचे आणि नंतर मात्र हळूच पुलवामासह अन्य दहशतवादी कृत्यांची कबुली द्यायची, असं पाकिस्तानचं वर्तन आहे. दोनच दिवसांपूर्वी एका नेत्यानं बालाकोट हल्ल्यात तीनशे दहशतवादी ठार झाल्याची दिलेली कबुली पाकिस्तान ही दहशतवादी पोसणारी भूमी असल्यावर शिक्कामोर्तब करते. गेल्या काही दिवसांत तीन कडव्या दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तान फार कडक भूमिका घेत असल्याचं किमान माध्यमांतून दिसत असल्यानं जगाला आश्‍चर्याचा धक्का बसण्याचं कारण नाही. फायनान्शिअल क्शन टेकन फोर्स (एफएटीएफ) या जागतिक संस्थेनं पाकिस्तानची कोंडी केली आहे. पाकिस्तानाचा गेल्या तीन वर्षांपासून करड्या यादीत समावेश असल्यानं त्याची आर्थिक कोंडी झाली आहे. चीन सोडून कुणीही मदत करायला तयार नाही. गुंतवणुकीवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. अशा स्थितीत आणखी कोंडी टाळायची असेल, तर किमान दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचं दाखवावंच लागेल. तसं केलं नाही, तर पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. तसं झालं, तर आणखी आर्थिक निर्बंध येतील. पुढच्याच महिन्यात एफएटीएफची बैठक होणार आहे. या संस्थेने टेरर फंडिग आणि अन्य प्रकरणात पाकिस्तान काहीच कारवाई करीत नाही, असा ठपका ठेवला होता. हा ठपका पुसून निर्बंध उठावेत, म्हणून पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचं किमान नाटक तरी करावं लागतं. संयुक्त राष्ट्राच्या एका नियमाचा आधार घेत दहशतवाद्यांना खर्चासाठी महिन्याला प्रत्येकी दीड लाख रुपये देणारा पाकिस्तान आणि आरोग्याच्या नावाखाली जगभरातून मिळविलेला कोट्यवधी रुपयांचा निधी दहशतवाद्यांना पोसण्यासाठी देणारा पाकिस्तान जगाला माहीत नाही, असं थोडंच आहे. मुंबईवरील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, असं आतापर्यंत म्हणणारा पाकिस्तान मिजाशीच्या नादात हल्ल्याची कबुली देऊन बसला आहे. पाकिस्तान अडचणीत आला, की मग दहशतवाद्यांना आम्ही पोसत नाही, असं सांगायला लागतो. एफएटीएफच्या अहवालात मात्र पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबाबतच्या कचखावू भूमिकेवर चांगलाच ठपका ठेवण्यात आला असून पुढची संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आता पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करतो आहे. ही कारवाईही दहशतवादी कृत्यं केली, म्हणून नाही, तर दहशतवाद्यांना पैसा पुरवला, म्हणून आहे. एरव्ही किरकोळ घटनांतील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देणार्‍या  पाकिस्तानमध्ये एकाही दहशतवाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली नाही, हे वास्तव लपविता येत नाही.

  जैश-ए-मोहंमद ही कडवी आणि खतरनाक दहशतवादी संघटना आहे. दिल्लीतील संसदेवर हल्ला, पठाणकोटच्या हवाई तळावरील हल्ला,उरीचा हल्ला, पुलवामाचा आत्मघाती दहशतवादी हल्ला आदी बहुतांश प्रकरणात जैश-ए-मोहंमदचा हात आहे. भारतानं त्याबाबतचे पुरावे वारंवार दिले; परंतु गेल्या एका तपापासून पाकिस्ताननं जैशचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानात असल्याचं नाकारलं होतं. त्याचा दहशतवादाशी संबंधही नाकारला होता. अजहरला येत्या 18 जानेवारीपर्यंत अटक करण्याचे निर्देश आता पाकिस्तानी न्यायालयानं दिले आहेत. पाकिस्तानमधील पंजाबच्या गुजरांवाला दहशतवाद विरोधी न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी अजहरला दिलेल्या मुदतीपर्यंत अटक केली नाही, तर न्यायालय त्याला गुन्हेगार म्हणून घोषित करू शकतं. या आधी गुजरांवला न्यायालयानं मसूद अजहरला शुक्रवारी न्यायालयात आणण्याचे आदेश दिले होते; मात्र पोलिस त्याला अटक करू शकले नाहीत. त्यानंतर न्यायलयानं मसूदला 18 जानेवारीपर्यंत अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद देण्यासारखे अनेक आरोप मसूद अजहरवर आहेत. मसूदचा ठावठिकाणा माहीत नसल्याचं पाकिस्ताननं कित्येक वेळा न्यायालयाला तसंच माध्यमांना सांगितलं आहे. त्यानंतर गुजरांवाला न्यायालयाच्या न्यायाधीश नताशा नसीम सुप्रा यांनी मसूदला 18 जानेवारीपर्यंत बेड्या ठोकण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळं मसूद पाकिस्तानमध्येच असल्याचं स्पष्ट होत आहे. न्यायालयाच्या आदेशामुळं पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहे. पाकिस्तानी न्यायालयानं मसूद अजहरला पकडण्याचे आदेश दिलेले असले, तरी एफएटीएफच्या कारवाईच्या भीतीनं पाकिस्तान ही कारवाई करत असल्याचं भारतीय अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. जागतिक बँक, युरोपीय महासंघ यांच्याकडून आर्थिक मदत मिळवण्यास पाकिस्तानला अडचणी येऊ शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच मसूदला 18 जानेवारीपर्यंत अटक करण्याचं फर्मान सोडलेलं आहे, असं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी पोलिस दहशतवादी मसूद अजहरला 18 जानेवारीपर्यंत अटक करू शकले नाहीत, तर पाकिस्तानी न्यायालय मसूदवर वेगवेगळे आरोप ठेवू शकतं. त्यांनतर दहशतवादी कारवायांमध्ये सहकार्य केल्याप्रकरणी न्यायालय मसूदला दोषी ठरवू शकतं. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड, ‘लष्कर-ए-तोयबा’चा ऑपरेशनंन्स कमांडर, दहशतवादी जकीउर रहमान लखवीला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘टेरर फंडिंग’ प्रकरणी पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. गेल्याच आठवड्यात टेरर फंडिंग प्रकरणी जकीउर रहमान लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. डिस्पेन्सरीच्या नावावर पैसा जमा करून त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ले झाले होते. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 लोक जखमी झाले होते. जकीउर रहमना लखवी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याचा मुंबई पोलिस शोध घेत होते. भारत सरकारनं त्याला सप्टेंबर 2019मध्ये ‘यूएपीए’ अंतर्गत दहशतवादी घोषित केलं होतं. 26/11च्या हल्ल्याच्या तपासात लखवीनंच हाफिज सईदला मुंबई हल्ल्याचा कट रचून दिल्याचं उघड झालं होतं. मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात जकीउर रहमान लखवीला अटक करण्यात आली होती; मात्र पाकिस्तान सरकारनं त्याला एप्रिल 2015मध्ये सोडलं होतं. लखवी विरोधात कोणतेही आरोप नसल्याचं कारण पुढं करत त्याला सोडून देण्यात आलं होतं. तुरुंगात असतानाही त्याच्या दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. आता त्याला टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आली. अतिरेक्यांना मदत आणि आर्थिक रसद पोहोचवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्याअगोदर पाकिस्तानमधील न्यायालयानं मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी आणि त्यामधील सहभागामुळे लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दहशतवादी संघटनेच्या चार अन्य सदस्यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रानं हाफिज सईदला मोस्ट वाँटेड दहशतवादी घोषित केल्यानंतर गेल्या वर्षी 17 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. हाफिज सईदसह त्याचे दोन साथीदार जफर इकबाल आणि याह्या मुजाहिद या दोघांना दहा वर्षे सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर हाफिजचा नातेवाइक असलेल्या अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हाफिजला यापूर्वीदेखील कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लष्कर ए तोयबाची फ्रंट ऑर्गनायझेशन ‘जमात-उद-दावा’चा प्रमुख असलेल्या हाफिज सईदला आणि त्याच्या सहकार्‍यांना दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी फेब्रुवारी 2020 मध्ये 11 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये 26/11 बाबत चाललेल्या खटल्यात हाफिज सईदला इतके दिवस अटकच होत नव्हती. या हल्ल्यातील दुसरा आरोपी डेव्हिड हेडलीची साक्ष आणि भारतानं दिलेल्या अनेक पुराव्यानंतरही पाकिस्तान हाफिज सईदवर कारवाई करत नव्हतं; मात्र आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या कूटनीतीनंतर अखेर हाफिज सईदला बेड्या ठोकण्यात आल्या आणि आता शिक्षादेखील सुनावण्यात आली आहे.


Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5554,letest News,585,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,315,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,138,अहमदनगर,9990,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,663,देश,4162,नाशिक,776,पुणे,599,बीड,1424,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15403,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12504,महाराष्ट्र सातारा,27,मुंबई,3450,विदेश,637,संपादकीय,1469,सातारा,3159,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: दहशतवाद्यांवर ‘ना’पाक कारवाई
दहशतवाद्यांवर ‘ना’पाक कारवाई
https://1.bp.blogspot.com/-_VgVry9hI5g/X_sHqhKsMhI/AAAAAAABm8o/keFPAVWfbjsGVqkePGc5Pi4uJ3Dw3NukQCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-_VgVry9hI5g/X_sHqhKsMhI/AAAAAAABm8o/keFPAVWfbjsGVqkePGc5Pi4uJ3Dw3NukQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_623.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_623.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content