$type=ticker$snippet=hide$cate=0

कृषी कायद्यांच्या समर्थकांचा समितीतील समावेशाने आश्‍चर्य ; श्रीगोंद्याचे अनिल घनवट हे महाराष्ट्रातील एकमेव सदस्य

अहमदनगर/नवी दिल्ली : कृषी कायद्याची समीक्षा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. अवघ्या चार सदस्यांच्या या स...

अहमदनगर/नवी दिल्ली : कृषी कायद्याची समीक्षा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. अवघ्या चार सदस्यांच्या या समितीत दोन सदस्य हे कृषी कायद्यांचे समर्थक असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या समितीत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या रुपाने मराठमोळ्या व्यक्तीचाही समावेश करण्यात आला आहे.  

या समितीत भारतीय किसान युनियनचे नेते भूपिंदर सिंह मान, आंतरराष्ट्रीय खाद्य नीती संस्थेचे डॉ. प्रमोदकुमार जोशी, कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी आणि शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांचा समावेश आहे. या चार सदस्यीय समितीत महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते घनवट यांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या समितीतील दोन्ही शेतकरी नेते हे कृषी कायद्याचे समर्थक असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शेतकरी नेते भूपिंदर सिंह मान यांनी उघडपणे आणि घनवट यांनी काही सुधारणा सुचवून या कायद्यांना पाठिंबा दिला आहे.

    मान यांनी मोदी सरकारच्या या तीनही कायद्यांचे वेळोवेळी समर्थन केले आहे. गेल्या महिन्यात 14 डिसेंबर रोजी त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्रही लिहिले होते. त्यात त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. मोदी यांनी भारताच्या कृषी व्यवस्थेला मुक्त करण्यासाठी जे कायदे आणले आहेत, त्याचे समर्थन करण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काही लोक शेतकर्‍यांमध्ये चुकीचा समज पसरवत आहेत, असे मान यांनी या पत्रात म्हटले होते. घनवट यांनी कालच नांदेड येथील एका कार्यक्रमात कृषी कायद्याला पाठिंबा दिला होता. या कायद्यात थोडाफार बदल करून हा लागू करणे शेतकर्‍यांच्या हिताचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच कायद्याला समर्थन असले, तरी सरकारला आमचा बिलकूल पाठिंबा नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे चार सदस्यांच्या समितीत कृषी कायद्यांचे दोन समर्थक असल्याने ही समिती निष्पक्षपाती चौकशी कशी करेल का, असा सवालही केला जात आहे. 


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5573,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10035,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,667,देश,4194,नाशिक,779,पुणे,623,बीड,1425,बुलडाणा,3,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15529,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12640,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3478,विदेश,637,संपादकीय,1477,सातारा,3169,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कृषी कायद्यांच्या समर्थकांचा समितीतील समावेशाने आश्‍चर्य ; श्रीगोंद्याचे अनिल घनवट हे महाराष्ट्रातील एकमेव सदस्य
कृषी कायद्यांच्या समर्थकांचा समितीतील समावेशाने आश्‍चर्य ; श्रीगोंद्याचे अनिल घनवट हे महाराष्ट्रातील एकमेव सदस्य
https://1.bp.blogspot.com/-vroFy6wlH7U/X_2qCxHhbVI/AAAAAAABnCQ/NocXQGuihhkWlQ_Rvtytda3jdLqB8B7TwCLcBGAsYHQ/s0/images.png
https://1.bp.blogspot.com/-vroFy6wlH7U/X_2qCxHhbVI/AAAAAAABnCQ/NocXQGuihhkWlQ_Rvtytda3jdLqB8B7TwCLcBGAsYHQ/s72-c/images.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_624.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_624.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content