धनदांडग्यांनी यांनी अतिक्रमणे करून टपऱ्या दिल्या भाड्याने पारनेर प्रतिनिधी- पारनेर येथील अतिक्रमणे तहसीलदार ज्योती देवरे यांनी काढले त्यानंत...
धनदांडग्यांनी यांनी अतिक्रमणे करून टपऱ्या दिल्या भाड्याने
पारनेर प्रतिनिधी- पारनेर येथील अतिक्रमणे तहसीलदार ज्योती देवरे यांनी काढले त्यानंतर त्यांचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले त्यानंतर तालुक्यातील इतरही अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती.त्याच धर्तीवर सुपा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने नागरीकांमधून या कारवाईचे स्वागत केले आहे.नगर- पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा चौक ते पारनेर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणा विरोधात पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी अक्रमक भुमिका घेतल्याने अतिक्रमण धारकांची पळता भुई थोडी झाली आहे.नववर्षाच्या मुहूर्तावर सुपा पोलिसांनी ही धडक कारवाई सुरू केल्याने ग्रामस्थांमधून त्यांचे स्वागत केले जात आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजता उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्या सह सुमारे वीस कर्मचार्यांचा ताफा सुपा येथील चौकात आल्याने सर्वांच्या नजरा भिरभिरु लागल्या एवढी कुमक कोणत्या कारणासाठी आली असेल अशी चर्चा सुरू असतानाच पोलीसांनी रस्त्याच्या कडेला दुतर्फा असलेल्या अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली.रस्त्यालगत असलेले अतिक्रमण तात्पुर्त्या स्वरूपात काढण्यात आली.यास विरोध करणाऱ्या सुमारे सहा ते सात जणांना सरकारी वाहनामध्ये बसवून पोलीस स्टेशनकडे नेण्यात आले.अतिक्रमण धारकांना तोंडी आदेश देण्यात आले.रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढून घेण्यात यावे अन्यथा कारवाईला सामोरे जा असा आदेश पोलिसांनी यावेळी दिला.
तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात सुमारे बारा ते तेरा गावातील नागरीकांची ये-जा आहे. मुख्य म्हणजे सुपा औद्योगिक वसाहत झपाट्याने वाढत चालली असल्याने कंपणीचे अधिकारी,कामगार, नोकरी निमित्त आलेले नागरिक यांचे मोठे वास्तव आहे.सुपा-पारनेर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असल्यामुळे याठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होते.बुधवारी बाजाराच्या दिवशी तर नागरीकांना मोठा मनस्थाप सहन करावा लागतो.शेतकरी आपली भाजी विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसले तर हे अतिक्रमण धारक त्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून देतात असे प्रकार अनेकदा घडला आहे.अतिक्रमण हे अनेक वेळा कळीचा मुद्दा होत आहे अतिक्रमण धारकांकडून टपऱ्या भाड्याने दिले जाण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होतात आणि त्यातून हजार रुपये गरिबांकडून भाडे उकळले जात आहे अनेकांनी यावर व्यवसाय सुरू केला आहे शासकीय जागेत अशा प्रकारे दुरुपयोग होत असल्याने प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे.
सुपा- पारनेर रस्त्याच्या दुतर्फा अनेकांनी रस्त्यालगत अतिक्रमण करून मोठ मोठ्या टपऱ्या थाटल्या आहेत.या टपऱ्या दुसऱ्याला भाड्याने देऊन प्रती महीना पाच ते सहा हजारांची कमाई त्या टपरीधारकाला मिळते.यामुळे जुने पोलीस स्टेशन परीसरात अतिक्रमण करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.याकडे गेली अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.मात्र पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या सारखा खमक्या पोलीस अधिकारी सुपा पोलीस स्टेशनला लाभल्याने पोलीस प्रशासन या अतिक्रमण विरोधात काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुन्हा अतिक्रमण करणाऱ्या व प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे!
पारनेर शहरातील अतिक्रमणावर तहसीलदारांनी यांनी हातोडा चालवला तर काही अतिक्रमण धारकांनी रातोरात आपापली अतिक्रमणे काढून घेतली त्यामुळे पारनेर शहराचा श्वास मोकळा झाला त्याच धर्तीवर सुपा येथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दुतर्फा रस्त्यावर अतिक्रमणे करण्यात आली होती ती काढण्या बाबत पोलिसांनी सूचना दिल्या याआधी वेळोवेळी हे अतिक्रमण काढण्यात आली पण काही दिवसांनी तेच लोक अतिक्रमण करत असतात यावरही प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत.