पुणे : जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या'सिरम' इन्स्टिट्यूट निर्मित 'कोविशिल्ड' या कोरोना प्रतिब...
पुणे : जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या'सिरम' इन्स्टिट्यूट निर्मित 'कोविशिल्ड' या कोरोना प्रतिबंधक लसचे देशात आजपासून लसीकरण सुरु झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर ठिकठिकाणी लसीकरणाला सुरुवात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गेल्या काही महिन्यांपासून अविरत मेहनत व संशोधन करून 'कोविशिल्ड' या लसीद्वारे जगाला कोरोना संकटावर मात करण्यासाठी आशेचा किरण दाखविलेल्या 'सिरम' इन्स्टिटयूटच्या आज सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेद्वारे ध्येयपूर्ती झाली आहे. याचवेळी लस सुरक्षित असल्याचा महत्वपूर्ण संदेश देत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनी स्वतः 'कोविशील्ड' लस टोचून घेतली आहे.