$type=ticker$snippet=hide$cate=0

शेतकरी आंदोलनाबाबत राष्ट्रपतींची नाराजी

नवीदिल्लीः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर...

नवीदिल्लीः संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उल्लेख केला. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं कौतुक करतानाच राष्ट्रपतींनी कृषी कायदे फायद्याचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.


अभिभाषणात राष्ट्रपतींनी कोरोना आणि इतर संकटांचा उहापोह करताना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. सरकारने योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचल्याचे सांगत राष्ट्रपतींनी सरकारला शाबासकी दिली. तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही राष्ट्रपतींनी भाष्य केले. सखोल चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा दहा कोटींपेक्षा जास्त छोट्या शेतकर्‍यांना तात्काळ मिळणे सुरू झाले आहे. छोट्या शेतकर्‍यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता, असे राष्ट्रपती म्हणाले.

सध्या या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचे पालन करेल. कृषी कायद्यांबद्दल शेतकर्‍यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाचा आदर करते; मात्र काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी आहे. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियमांचे गंभीरपणे पालन केले पाहिजे, हे ही सांगते, असे राष्ट्रपती म्हणाले. कोविंद म्हणाले, की नवीन कृषी कायद्यांची अंमलबजाणी करण्यापूर्वी जी व्यवस्था अस्तित्वात होत, जे अधिकार व सुविधा होत्या, त्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. उलट या कृषी सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून सरकारने शेतकर्‍यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारही दिले आहेत. कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत आहे. 

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10852,औरंगाबाद,380,क्रीडा,680,दखल,746,देश,4598,नाशिक,827,पुणे,858,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17477,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14786,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4162,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1635,सातारा,3218,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: शेतकरी आंदोलनाबाबत राष्ट्रपतींची नाराजी
शेतकरी आंदोलनाबाबत राष्ट्रपतींची नाराजी
https://new-img.patrika.com/upload/2019/11/27/pti952019000036b_5427415_835x547-m.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_649.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_649.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content