$type=ticker$snippet=hide$cate=0

दोषींना बळ आणि निर्दोषांचा काळ!

सरकारी काम आणि सहा महिने थांब असं असतं; परंतु भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीचा अहवाल विहित मुदतीत प्राप्त झाला. हा अहवाल म्हणजे डों...

सरकारी काम आणि सहा महिने थांब असं असतं; परंतु भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीचा अहवाल विहित मुदतीत प्राप्त झाला. हा अहवाल म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रयत्न आहे. नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकरणातील अहवालाचे निष्कर्ष पाहिले, तर त्यात चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्नीशमन यंत्रणा नव्हती, तिथं फायर ऑडिट झालेलं नव्हतं, असं सांगणार्‍या जिल्हा शल्यचिकित्सक, दोन परिचारिका आणि दोन डॉक्टरांचा बळी देताना ज्यांच्यावर इनक्युबेटरच्या देखभालीची जबाबदारी होती, त्यांना मात्र वाचविण्याचा प्रयत्न या अहवालातून होताना दिसतो आहे. 


कोणत्याही घटनेमागं काय कारण असतं, याचा खोलात जाऊन शोध घ्यावा लागतो. भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. डोळे उघडण्याअगोदरच त्यांना या जगातून जावं लागलं. बाळं आणि आईवडीलांना त्यांची पुरेशी ओळख झाली नसतानाही त्यांची कायमची ताटातूट झाली. ही घटना मानवनिर्मित, की नैसर्गिक हा चौकशीचा मुद्दा होता. नऊ जानेवारीच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटला आग लागली. यात दहा बाळं दगावली, तर सात बाळांना वाचविण्यात यश आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती; परंतु त्या अगोदर आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय वादात सापडला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य संचालकांना वगळण्यात आलं. गेले आठवडाभर या समितीनं चौकशी केली. या अहवालाकडं सर्वांच्या नजरा लागून होत्या. आताही डॉ.तायडे यांनीच विभागीय आयुक्तांना चौकशी अहवाल सादर केला आहे. त्यामुळं नेमकी चौकशी कुणी केली, हा प्रश्‍न उरतो. ज्यांच्या नावावरून वाद झाला, त्यांनीच चौकशी केली असेल, तर मग चौकशी अहवाल ही एक प्रकारची धूळफेक होती, असं म्हणायला वाव आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकासह दोन परिचारिका आणि इतर दोन कर्मचार्‍यांवर हलगर्जीपणाचा ठपका चौकशी समितीनं ठेवला असून त्यांच्या बडतर्फीची शिफारस करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. त्याबाबत दुमत असता कामा नये; परंतु दोषी कोण हे आपल्या सोईनुसार ठरायला नको. घटनेच्या दिवशी रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिका नव्हत्या. त्यांच्यावर कारवाई करण्याला कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही; परंतु त्यापेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील इनक्युबेटरला आग लागून त्यात दहा बाळांचा मृत्यू झाला. इनक्युबेटरला शॉर्ट सर्किट कसं झालं, हा संशोधनाचा मुद्दा असून त्याकडं नेमकं चौकशी समितीनं दुर्लक्ष केलं. चौकशी समितीच्या आपल्या 50 पानी अहवालात शॉर्ट सर्किटमुळं रुग्णालयात आग लागली असल्याचं यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. शार्ट सर्किटमुळं आग लागली असेल, तर मग इतरांवर ठपका कसा असा प्रश्‍न यानिमित्तानं उपस्थित होतो. शॉर्ट सर्किटमुळं एका बॉडी वार्मरमध्ये आग लागली होती. त्यानंतर काही वेळानं आउटबॉर्न विभागात आग पसरली, असं समितीनं अहवालात स्पष्ट केलं आहे. या वार्डाचा दरवाजा लवकर न उघडल्यानं बाळांना वाचविता आलं नाही.

शार्ट सर्किटचं कारण शोधलं, तर बालकांचा मृत्यू अपघाती नाही, हे स्पष्ट आहे. इन्क्युबेटरच्या वार्षिक तपासणीसाठी एम.कॉम. पास कर्मचारी नेमण्याचं दिव्य आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी केलं. आरोग्य विभागाच्या या अधिकार्‍यांवर काहीच ठपका ठेवण्यात आलेला नाही. फेबर सिंदुरी या कंपनीला इन्क्युबेटर मेंटेनन्सचं काम देण्यात आलं होतं; मात्र त्या कंपनीनं कोणत्या दर्जाचे कर्मचारी तिथं ठेवावेत, याविषयी कोणताही करार आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी केला नव्हता. परिणामी इन्क्युबेटरच्या स्फोटामुळं दहा नवजात बालकांचा बळी गेला, अशी धक्कादायक माहिती तपासणी अहवालातून पुढं आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, दोन परिचारिका आणि काही कर्मचारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई अहवालात सुचवण्यात आली असली, तरी हे करार करणारे, व सदोष इन्क्युबेटर खरेदी करणारे मात्र नामानिराळे ठेवण्याचं घाटलं जात आहे. ज्या इन्क्युबेटरचा स्फोट झाला, त्याच्या मेंटेनन्सचं काम पुण्याच्या फेबर सिंदुरी या कंपनीला कंपनीला देण्यात आलं होतं. इनक्युबेटरचा स्फोट झाला. नवजात बालकं धुरामुळं गुदमरून मेल्याचं निदर्शनास आलं. ज्या खोलीत आग लागली, त्याच्या बाजूला नुकतीच जन्मलेली सात मुलं ठेवली होती; मात्र त्याचे दरवाजे उघडून त्या मुलांना वेळीच बाहेर काढल्यामुळं ती मुलं वाचली. याठिकाणी कोणत्याही यंत्रसामुग्रीची दुरुस्तीच झालेली नव्हती, असं निष्पन्न झालं आहे.

ही संपूर्ण चौकशी इन कॅमेरा करण्यात आली असून प्रत्येकाचं म्हणणं व्हिडीओ रेकॉर्डिंग करून घेण्यात आलं; मात्र या संपूर्ण प्रकरणात बडे अधिकारी नामानिराळे ठेवण्यात आले. डॉ. तायडे यांनी अहवाल विभागीय आयुक्तांना दिला आहे, तेच याविषयी सांगू शकतील, असं सांगितलं. याचा अर्थ ही चौकशी विभागीय आयुक्तांनी केली, की आरोग्य संचालकांनी हा प्रश्‍न तसाच शिल्लक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, दोन परिचारिका व कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई सुचवण्यात आली असली तरी, ज्यांची खरी जबाबदारी होती, त्यांना मात्र वाचविण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयातील आगीत सात बालकं बचावली. या बचावलेल्या बालकांना रुग्णालयातील आयुष कक्षात दाखल करण्यात आलं होतं. यापैकी पाच बालकांना आता सुटी देण्यात आली आहे. ही बालकं आपल्या आईच्या कुशीत परतली आहेत, तर एका बालकाला नागपूरला हलविण्यात आलं आहे. एक बालक अजूनही आयुष कक्षात उपचार घेत आहे. या अहवालाचा अभ्यास आणि चर्चा विभागस्तरावर केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अहवाल सादर केला जाईल. अहवालाच्या निष्कर्षाच्या अनुषंगानं कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्‍यांना शिक्षा होईल, यात शंका नाही; मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असं आश्‍वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. आतापर्यंत अशा दुर्घटनांचे अहवाल येतात आण ते धूळखात पडून असतात, असा अनुभव आहे. तसं या अहवालाचं होऊ नये, अशी अपेक्षा वावगी म्हणता येत नाही. राज्यातील सर्व जिल्हा सामान्य रुग्णालयांतील उपकरणं हाताळणं व त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्य शासनानं तीन वर्षांपूर्वी चेन्नईस्थित फेबर सिंदुरी या कंपनीला कंत्राट दिलं. या कंपनीच्या माध्यमातून सामान्य रुग्णालयात एक अभियंता नियुक्त करून त्याच्या माध्यमातून सर्व उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करणं गरजेचं आहे; मात्र या कंपनी आणि अभियंत्यानंही याकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळं उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळंच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात दहा नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागला. शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा अत्याधुनिक व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आली. या यंत्रसामग्रीच्या देखभाल-दुरुस्ती व उपकरण हाताळण्याच्या जबाबदारीचं कंत्राट तीन वर्षांपूर्वी शासनानं फेबर सिंदुरी कंपनीला दिलं. या करारानुसार या कंपनीला राज्यातील सर्व जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपकरणं हाताळणं व त्यात काही त्रुटी आढळल्यास त्याची दुरुस्ती करून ते वापरणं योग्य असल्याची खातरजमा करणं गरजेचं होतं. यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपकरणं हाताळण्यासाठी एका अभियंत्याची नियुक्ती करणं गरजेचं आहे. कंपनीने उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक कालबद्ध कार्यक्रम तयार करायचा असतो. त्या शेड्यूलनुसार कंपनीच्या या अभियंत्यानं दर महिन्याला उपकरणांची देखभाल दुरुस्ती करणं गरजेचं आहे. या तपासणीनंतरच उपकरणं उपयोगात आणणं बंधनकारक आहे; परंतु त्याकडं कुणाचंही लक्ष नाही. कंत्राट मिळाल्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांत कंपनीकडून नियमित उपकरणांची देखभाल दुरुस्ती केली. त्यानंतर मात्र दुर्लक्ष केलं जातं. याच दुर्लक्षामुळं जिल्हा रुग्णालयात नवजात शिशू केअर युनिटमध्ये लावलेल्या इनक्युबेटरमध्ये तांत्रिक बिघाड आला. तपासणीअभावी तो तसाच सुरू राहिला आणि यातूनच ही दुर्घटना घडली. त्यामुळं या कंपनीच्या कारभाराची चौकशी होणं आवश्यक असताना त्यावर मात्र अहवालात फारसं भाष्य नसल्याचं समजतं. दया संदर्भात कंपनीची बेपर्वाई इतकी, की ती यासंबंधीच्या प्रश्‍नांनाही उत्तर द्यायला तयार नाही. 


Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5770,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,202,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,39,satara,147,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10334,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,706,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16434,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13676,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3706,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1552,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: दोषींना बळ आणि निर्दोषांचा काळ!
दोषींना बळ आणि निर्दोषांचा काळ!
https://1.bp.blogspot.com/-HU8zPrRm6tA/YAl23kAp2tI/AAAAAAABnZI/BRiFmUJOCe88AUqJKfge-jCR0l72rgSVQCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-HU8zPrRm6tA/YAl23kAp2tI/AAAAAAABnZI/BRiFmUJOCe88AUqJKfge-jCR0l72rgSVQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_656.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_656.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content