$type=ticker$snippet=hide$cate=0

सातारा शहरातीप पोवई नाक्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

गजबलेल्या परिसरात जुगाराचे अड्डे चालत असल्याने परिसरात अस्थिरतेचे वातावरण सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील पोवई नाक्यावरील दूध डेअरी परिस...


गजबलेल्या परिसरात जुगाराचे अड्डे चालत असल्याने परिसरात अस्थिरतेचे वातावरण

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील पोवई नाक्यावरील दूध डेअरी परिसरात भरलेला जुगार अड्डा सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने उध्दवस्त केला. याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकूण 3 लाख 16 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा शहरातील पोवई नाका या नेहमी गजबलेल्या ठिकाणी जुगाराचे अड्डे चालविले जात असल्याने या परिसरातील रहिवाशी तसेच व्यावसायिकांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गैरप्रकारांना पोलिसांनी तात्काळ आळा घालून लोकांना भयमुक्त करावे, अशी मागणी होवू लागली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवार, दि. 1 रोजी साडेसात वाजता सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील सातारा कॅफे व दुध डेअरी परिसरात जुगार अड्डा भरला असल्याची माहिती सातारा उपविभागीय कार्यालयातील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून टनास्थळी छापा टाकला. छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांना पाहताच संशयितांची पळापळ झाली. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पाहणी केली असता तेथे जुगार सुरु असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांचा छापा पडल्यानंतर परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. कारवाई दरम्यान पोलिसांनी संतोष दिलीप मतकर (वय 32, रा. मंगळवार पेठ), अक्षय वाघमारे (24, रा. जगतापवाडी, शाहूनगर), अमर चंद्रकांत जाधव (32, रा. शाहूपुरी), सुमित परशुराम बनसोडे (22, रा. म्हसवे, ता. सातारा), अक्षय नंदू जाधव (23, रा. करंजे पेठ), अक्षय संजय जाधव (25, रा. रविवार पेठ), फिरोज युनुस पठाण (50, रा. सदरबझार), सुभाष वसंत मोरे (45, रा. बेबलेवाडी ता. सातारा), जीवन कृष्ण काळे (42, रा. करंजे पेठ) यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथे रोख रक्कम, मोबाईल. दुचाकी, रिक्षा असा तब्बल 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन पोलिस ठाण्यासमोर लावला. संशयितांविरुध्द जुगारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भिमराव यादव, इनायतुल्ला मुल्ला, मुस्तफा शेख, संतोष देेशमुख यांनी कारवाईत सहभाग घेतला.


Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5550,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,3,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9981,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,661,देश,4153,नाशिक,776,पुणे,596,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15379,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12478,महाराष्ट्र सातारा,26,मुंबई,3446,विदेश,637,संपादकीय,1467,सातारा,3157,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सातारा शहरातीप पोवई नाक्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
सातारा शहरातीप पोवई नाक्यावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
https://1.bp.blogspot.com/-L9dHx5Dz4Xg/X_HbL5DAe8I/AAAAAAABmiw/b9XpX6OZZNE2WTDS5ClKojha8Clgu55lgCLcBGAsYHQ/s0/Jugar%2BAdda.jpg
https://1.bp.blogspot.com/-L9dHx5Dz4Xg/X_HbL5DAe8I/AAAAAAABmiw/b9XpX6OZZNE2WTDS5ClKojha8Clgu55lgCLcBGAsYHQ/s72-c/Jugar%2BAdda.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_662.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_662.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content