$type=ticker$snippet=hide$cate=0

मुंबईवरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटक

  इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड जकीउर रहमान लखवी याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याला टेरर फायनान्सिंग...

 



इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड जकीउर रहमान लखवी याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याला टेरर फायनान्सिंग प्रकरणात अटक करण्यात आली. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ले झाले होते. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 लोक जखमी झाले होते. जकीउर रहमना लखवी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याचा मुंबई पोलिस शोध घेत होते. 

भारत सरकारने त्याला सप्टेंबर 2019मध्ये यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केले होते. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. 26/11च्या हल्ल्याच्या तपासात लखवीनेच हाफिज सईदला मुंबई हल्ल्याचा कट रचून दिल्याचे उघड झाले होते. मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी त्याला यपूर्वीच अटक करण्यात आली होती; मात्र पाकिस्तान सरकारने लखवी विरोधात कोणतेही आरोप नसल्याचे कारण पुढे करत सोडून देण्यात आले होते. तुरुंगात असतानाही त्याच्या दहशतवादी कारवाया सुरूच होत्या. आता त्याला टेरर फंडिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अतिरेक्यांना मदत आणि आर्थिक रसद पोहोचवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट घडवून आणला होता. हल्ले करणार्‍या दहापैकी नऊ दहशतवाद्यांना मुंबई पोलिस आणि एनएसजीच्या कमांडोंनी कंठस्नान घातले तर अजमल आमीर कसाब हा दहशतवादी पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते आणि या हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. 


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4132,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15277,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,154,महाराष्ट्र,12359,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3420,विदेश,634,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: मुंबईवरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटक
मुंबईवरील हल्ल्याच्या मास्टरमाईंडला अटक
https://hindi.cdn.zeenews.com/hindi/sites/default/files/2014/12/26/60952-lakhvi.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_67.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_67.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content