अहमदनगर : जस्मीत वधवा या नगरच्या तरुणाने इंडिया गेट दिल्ली ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई पर्यंत पाच दिवसात सायकल प्रवास करून अंतर पार केले याबद्...
अहमदनगर :
जस्मीत वधवा या नगरच्या तरुणाने इंडिया गेट दिल्ली ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई पर्यंत पाच दिवसात सायकल प्रवास करून अंतर पार केले याबद्दल त्यांचा चांदबिबी मॉर्निंग ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय झिंजे, दादा भाकरे, प्रकाश जोशी, श्रीपाद कुलकर्णी, संजय बाले, राहीज सर, अभय मुथा, चीनुभाई निक्रड, नरेंद्र लोळगे, अजय झिंजे, जाधव मेजर, शंतनु मोहारे आदिंसह सर्व सभासद उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, आज प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी विविध प्रकारचे व्यायाम करत आहेत. परंतु त्याचबरोबर एखादे ध्येय ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न करुन ते साध्य करणारे फार कमी लोक आहेत. असेच ध्येय ठेवून जस्मीत वधवा याने दिल्ली ते मुंबई हे 1 हजार 460 किलो मीटरचा पल्ला पाच दिवसात गाठून एक उंच्चाक निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. ध्येय निश्चित असले की यश नक्कीच मिळत असते. हे जस्मीतने आपल्या उपक्रमातून दाखवून दिले आहे. चाँदबिबी मार्निंग ग्रुपसाठी ते एक ऑयडॉल आहेत, अशा शद्बात त्यांनी जस्मीत वधवा यांचे कौतुक केले. दिल्ली ते मुंबईदरम्यान 1 हजार 460 किलोमीटरचा पल्ला असलेले अंतर पाच दिवसात सायकलवर जी-टू-जी सायकल राईड यशस्वीपणे पुर्ण करुन शहरात आलेले नगरचे भूमीपुत्र जस्मितसिंह वधवा यांचा नगरकरांच्या वतीने जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जस्मीत वधवा म्हणाले, कठोर परिश्रम, जिद्द व नगरकरांच्या प्रेमामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण करु शकल्याचे सांगून, पुढील ध्येय काश्मीर ते कन्याकुमारी के टू के सायकल राईडचा संकल्प व्यक्त केला. तर नगरमधून पुढील जी टू जी सायकल राईडसाठी पाच सायकलपटू पाठविण्याचा मानस व्यक्त केला आहे. या सत्कारामुळे पुढील संकल्पही पुर्ण होण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.