$type=ticker$snippet=hide$cate=0

दाऊदच्या ड्रग्ज फॅक्टरीवर आणखी एक आघात

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड आरिफ भुजवाला याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने बेड्या ठोकल्या आहेत. भुजवाला हा दाऊद ...

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड आरिफ भुजवाला याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने बेड्या ठोकल्या आहेत. भुजवाला हा दाऊद गँग आणि दुबईतील ड्रग्ज नेटवर्कच्या थेट संपर्कात होता. एनसीबीने केलेल्या छापेमारीपासून भुजवाला फरार होता. अखेर त्याला रायगडमधून अटक करण्यात आली. भुजवालाला प्रति दाऊद असेही म्हटले जाते. 


    कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करत एनसीबीने भुजावालाच्या घरावर धाड टाकली होती. भुजवाला मुंबईतील डोंगरी भागात ड्रग्जची फॅक्टरी चालवत होता. छापेमारीसाठी एनसीबी भुजवालाच्या घरी पोहोचली, तेव्हा तो खिडकीतून उडी मारुन पसार झाला. एनसीबीच्या हातावर तुरी देऊन भुजवाला पसार झाला; मात्र ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा 12 प्रकारचा कच्चा माल, कोट्यवधी रुपयांची रोकड आणि हत्यारे जप्त करण्यात आली होती. भुजवालाने आपले जाळे फक्त मुंबईतच नव्हे, तर परदेशापर्यंत पसरवले होते. अंडरवर्ल्ड माफिया करीम लालाचा नातेवाइक चिंकू पठाणला एनसीबीने गजाआड केले आहे. पठाणच्या चौकशीत आरिफ भुजवाला आणि त्याच्या ड्रग्ज फॅक्टरीची माहिती समोर आली. त्यानंतर दाऊदच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या भुजावालाला पकडण्याची योजना एनसीबीने आखली होती. एनसीबीचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांनीच डी कंपनीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. दाऊदच्या डोंगरीत घुसून त्यांनी कारवाई केली. इतकेच नाही, तर दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्याही आवळल्या. वानखेडे यांनी डोंगरीतील ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त केली. त्यामुळे वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  करण सजनानी ड्रग कनेक्शनमध्ये समीर खान यांचे नाव समोर आले. त्यानुसार आम्ही त्यांना चौकशीला बोलवल आणि यात त्याची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांना अटक केली आहे. याच प्रकरणात वांद्रयामधून एका व्यक्तीला एनसीबी कार्यालयात आणण्यात आले आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती वानखेडे यांनी दिली. समीर खान आणि करण सजनानी यांच्यात किरकोळ रकमेचे व्यवहार झाले नसून ते मोठे आहेत. शिवाय समीर खानने ड्रग्स सेवन केल्याचे पुरावे आहेत. त्याआधारे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. 

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10907,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17566,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,176,महाराष्ट्र,14890,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: दाऊदच्या ड्रग्ज फॅक्टरीवर आणखी एक आघात
दाऊदच्या ड्रग्ज फॅक्टरीवर आणखी एक आघात
https://mumbaimirror.indiatimes.com/photo/77696057.cms
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_680.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_680.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content