श्रीनगरः जम्मू जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. या वेळी झालेल्या चकमकीत चार जवानदेखील जखमी झाले आहेत. ...
श्रीनगरः जम्मू जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. या वेळी झालेल्या चकमकीत चार जवानदेखील जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी अयशस्वी ठरवला आहे.
लष्करी सुत्रांचे म्हणणे आहे, की पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सोपे जावे, यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अखनूर सेक्टरच्या खौर भागात मंगळवारी सायंकाळी जोरदार गोळीबार सुरू केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कारचे चार जवान जखमी झाले. यानंतर भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. याचबरोबर घुसखोरीचा डाव देखील अयशस्वी ठरवला. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांचे मृतदेह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या दिशेने पडलेले आहेत. ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याने उचललेले नाहीत. 2021 मध्ये पाकिस्तानकडून केले गेलेले हे पहिले मोठे शस्त्रसंधीचे उल्लंघन आहे.