लाखोंचे सोने असलेली पिशवी खातेदाराला मिळाली परत देवीभोयरे येथील जगदंबा पतसंस्थेतील कर्मचार्यांचे कौतुक पारनेर/प्रतिनिधी : खातेदारांनी पतसंस...
लाखोंचे सोने असलेली पिशवी खातेदाराला मिळाली परत
देवीभोयरे येथील जगदंबा पतसंस्थेतील कर्मचार्यांचे कौतुक
पारनेर/प्रतिनिधी : खातेदारांनी पतसंस्थेच्या लॉकरमध्ये असलेले सोन्याचे दागिने बाहेर काढले. मात्र ते दागिने पुन्हा लॉकरमध्ये न ठेवता खातेदाराकडून पिशवी बाहेरच राहिली व ते लॉकर बंद करून निघून गेले. मात्र ही गोष्ट काही वेळाने संस्थेतील कर्मचार्यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना कल्पना दिली म्हणून जवळपास 7 ते 8 तोळे सोने या कर्मचार्यांच्या प्रामाणिकपणामुळे वाचले. हा प्रकार तालुक्यातील देवीभोयरे येथे घडला याबाबत या कर्मचार्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सहकारी पतसंस्था मर्या. देवीभोयरे देवीभोयरे येथील जगदं
बा पतसंस्थेत खातेदार तुकाराम श्रीपती बेलोटे यांचे लॉकरमध्ये असलेली सोन्याचे दागिने अंदाजे 7 ते 8 तोळे असलेली पिशवी लॉकर मध्ये परत न ठेवता नजरचुकीने बाहेर विसरले. व लॉकर बंद करून निघून गेले.क ाही वेळानंतर संस्थेचे कर्मचारी वसंत बाबुराव थोरात हे लॉकर रूममध्ये गेल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तात्काळ याबाबत अकॉन्टेट रविकांत घोडके व कॅशिअर संभाजी मुळे यांना सांगितली .त्यांनी ही पिशवी ताब्यात घेऊन त्यात सोन्याचे दागिने असलेले बॉक्स असल्याबाबत व्यवस्थापक राऊसाहेब वाढवणे व चेअरमन तुकाराम बेलोटे यांना सांगितले. चेअरमन व्यवस्थापक त्यांनी ताबडतोब येऊन पिशवी उघडली असता त्यात 7 ते 8 तोळे सोन्याचे दागिने दिसले. सदरचे दागिने तुकाराम श्रीपती बेलोटे यांची असल्याचे खात्री पटल्यानंतर त्यांना सर्व संचालक मंडळ व गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती सरपंच विठ्ठल सरडे,व्हा. चेअरमन शिवाजी बेलोटे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाषराव बेलोटे, चेअरमन अशोक राव मुळे, मंगेश मुळे दत्तात्रय मुळे, शिवाजी मगर, भास्कर मगर, विनोद साळवे व इतर सभासदांसमोर परत गेलेले दागिने परत दिले. दागिणे परत मिळाले बद्दल खातेदारांनी सर्व कर्मचारी वर्गाचे प्रामाणिकपणाबद्दल सत्कार केला.