जामखेड : जामखेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत चांगलीच वाढली असून, ;की ग्रामपातळीवरील निवडणुकीत अनेक नेत्यांचे वाक्युद्ध चांगेलच रंगताना...
जामखेड : जामखेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत चांगलीच वाढली असून, ;की ग्रामपातळीवरील निवडणुकीत अनेक नेत्यांचे वाक्युद्ध चांगेलच रंगताना दिसून येत आहे. कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती गत-टत विसरून बिनविरोध निवडणूक पार पाडतील, अशा ग्रामपंचायतींना ३० लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली. मात्र, त्यांच्या या घोषणेवर माजीमंत्री राम शिंदे यांनी पलटवार केला आहे.
निवडणूक आयोगाने आमिष दाखवणाऱ्या घोषणेची गंभीर दखल घ्यावी व रोहित पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिंदेंनी केली आहे. रोहित पवारांनी सध्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे. राम शिंदे गटापुढे त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. दोन्ही नेत्यांनी जास्तीतजास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात कशा राहतील याचे नियोजन केले आहे. आमदार निधीचा वापर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी करण्याचे पवारांचे नियोजन आहे. त्यांनी ज्या ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक करतील त्यांना तीस लाख रुपयांची घोषणा रोहित यांनी केली. त्यांच्या घोषणेला राम शिंदेंनी आव्हान देत निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे.
त्यांना माझा मुद्दा कळला नाही
आमदार रोहित पवारांनी राम शिंदेंना उत्तर दिले आहे. त्यांना माझा मुद्दा समजला नसल्याची टीका रोहित यांनी केली. बिनविरोध निवडणुकीमध्ये सर्व गटांना संधी असून उमेदवारांचा वाचलेला पैसा शेवटी गावाच्या विकासासाठीच कामाला येणार आहे. जामखेड-कर्जतमधील काही नेत्यांचा दबाव वापरून ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.