कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांची कोरोना च...
कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवालही निगेटीव्ह आलाय. शनिवरी सकाळी घरातील जिममध्ये व्यायाम करताना गांगुली यांनी हृदय विकाराचा झटका आला होता. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनकड यांनी वुडलँड हॉस्पीटलमध्ये गांगूलींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतिची चौकशी केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या आरोग्यासाठी पार्थना केली आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, गांगुलीला सौम्य झटका आला, हे ऐकून मला फार दुख झाले. गांगुली लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करते. आम्ही गांगुलीच्या कुटुंबासोबत आहोत, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी काल केले होते. भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. त्याच्या नेतृत्वाखाली 2003 मध्ये टीम इंडियाने 1983 नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नॅटवेस्ट सीरिजमध्ये भारताने धोबीपछाड दिला होता. त्या विजयानंतर लॉर्ड्सच्या गॅलरीत गांगुलीने टी-शर्ट काढून फिरवलेला तो प्रसंग साऱ्यांच्या आजही लक्षात आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. करोना संकटातही आयपीएल 20-20 चे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यात गांगुलीचा मोलाचा वाटा आहे.