इस्लामाबाद: आर्थिक संकटाचा सामना करणार्या पाकिस्तानला त्यांचा मित्र देश मलेशियाने जोरदार झटका दिला. मलेशियाने पाकिस्तानची सरकारी विमान कंपन...
इस्लामाबाद: आर्थिक संकटाचा सामना करणार्या पाकिस्तानला त्यांचा मित्र देश मलेशियाने जोरदार झटका दिला. मलेशियाने पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्या बोईंग 777 या प्रवाशी विमानाला जप्त केले आहे. या विमानाचे भाडे थकवण्यात आले होते. त्यानंतर मलेशियाने ही कारवाई केली.
या विमानात बसलेल्या प्रवाशी, कर्मचार्यांना उतरवण्यात आले. एवढा मोठा अपमान झाल्यानंतर पाकिस्तान सरकारवर टीका सुरू आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सच्या ताफ्यात एकूण 12 बोईंग 777 ही विमाने आहेत. या विमानांना वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेळोवेळी ड्राय लीजवर घेण्यात आले आहे. मलेशियाने जप्त केलेले विमानदेखील भाडे तत्वावर घेण्यात आले होते. भाडे करारातील अटीनुसार पैसे न दिल्यामुळे या विमानाला क्वालालंपूरमध्ये जप्त करण्यात आले. विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांचा अपमान करून त्यांना उतरवण्यात आले. याआधी सौदी अरेबियाने कर्जाची रक्कम फेडण्यासाठी पाकिस्तानकडे तगादा लावला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने मलेशियाच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्थानिक न्यायालयाच्या आदेशाने हे विमान ताब्यात घेण्यात आले असून ही एकतर्फी कारवाई असल्याचे म्हटले आहे. दोन्ही पक्षकारांमध्ये ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून मलेशियाने केलेली कारवाई निंदनीय आहे. पाकिस्तान सरकारनेही या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.