$type=ticker$snippet=hide$cate=0

फोडाफोडीचं राजकारण अंगलट

  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं अन्य पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेतलं; परंतु विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाढण्याऐवजी कमी झाल्...

 


महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं अन्य पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेतलं; परंतु विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाढण्याऐवजी कमी झाल्या आणि सत्ता हातातून गेली. विरोधी पक्षांचं अस्तित्वच पुसून टाकण्याचा चंग भाजपनं बांधला असून त्याचा फायदा तात्कालिक असतो. शत प्रतिशत भाजपचं स्वप्न पाहताना पक्षाचे मूळ, निष्ठावान कार्यकर्ते तर दूर जात नाहीत ना, याचा विचार आता किमान पश्‍चिम बंगालचा अनुभव लक्षात घेऊन भाजपनं करायला हवा. 

भारतीय जनता पक्षाला पश्‍चिम बंगालची सत्ता कोणत्याही परिस्थितीत मिळवायची आहे. दोनशे जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठेवलं आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार, आमदारांना गळी लावलं आहे. पक्ष वाढवण्यासाठी आणि जनतेत संदेश जाण्यासाठी हे दबावाचं राजकारण उपयुक्त असलं, तरी ते फार काळ चालणारं नसतं. आयारामांना पायघड्या आणि निष्ठावंताना पायपुसण्या असं करून चालत नसतं. तसं केलं, तर पक्षांत बंडाचं वारं वाहायला लागतं. या वार्‍याचं वादळात रुपांतर होणार नाही, याची दक्षता नेत्यांनी घ्यायची असते. पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या कारभाराला लोक कंटाळले असतील, तर भाजपला इतर नेत्यांना आयात न करताही सत्ता मिळविता येईल. पक्षानं अन्याय केला, म्हणून बाहेर पडणं वेगळं आणि मंत्रिपदं देऊनही कुणी बाहेर पडत असेल, तर त्याचं कारण वेगळं असतं. ममता बॅनर्जी आक्रस्ताळ्या आहेत. त्या हेकेखोर आहेत, हे खरं आहे. त्यांच्या पक्षाचं राजकारण दंडेलशाहीचं आहे, यातही दुमत नाही; परंतु असं असलं, तरी त्यांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देताना आपल्या पक्षातील नेत्यांच्या एवढ्या वर्षांच्या निष्ठांचं काय असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे. ज्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सातत्यानं भाजपच्या नेत्या, कार्यकर्त्यांवर हल्ले केले, त्यांनाच आता हार घातले जात असतील, तर जुने कार्यकर्ते नाराज होणार, यात कोणताीही शंका नाही. पक्षात नाराजांची संख्या वाढवून त्यावर सत्तेची पोळी भाजणं अवघड असतं. भाजपला त्याची जाणीव आहे, असं दिसत नाही; किंबहुना, महाराष्ट्रातील अनुभवानं भाजप शहाणा झाला आहे, असं दिसत नाही. त्यामुळं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या एक दिवस अगोदर भाजपचे कार्यकर्तेव आप-आपसांत भिडले. एकमेकांवर हल्ले केले. कार्यालयासमोरच्या गाड्या फोडल्या. हे एका ठिकाणी झालं नाही, तर दोन ठिकाणी झालं. ममता दीदींचे अनेक सरदार भाजपत येत आहेत. ममता दीदींवर एकीकडं दडपण येत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांतच असा जुना-नव्यातला संघर्ष रस्त्यावर येत असेल, तर पश्‍चिम बंगालमध्ये जंगलराज आहे, असं म्हणण्याचा मग भाजपला नैतिक अधिकारच राहत नाही. सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तीन मंत्र्यांनी  राजीनामे दिले असून ते भाजपत जाणार आहेत. भाजपसाठी हे आशादायी चित्र असताना तृणमूल काँग्रेसमधून येणार्‍यांना विरोध केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष दिलीप बोस यांच्या सभेच्या अगोदर दोन गट व्यासपाठीवरच आपसांत भिडत असतील, तर नाराजी कुठल्या थराला गेली आहे, हे लक्षात यायला हरकत नाही. पश्‍चिम बंगाल भाजपमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसमधून जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यामुळं भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील असंतोष वाढत आहे. याविरोधात बोलणार्‍या सायंतन बसू आणि अग्निमित्र पाल या दोन भाजप नेत्यांना पक्षानं कारणं दाखवा नोटीस बजावली. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना पक्षात घेण्यावरून भाजपचे स्थानिक नेते विविध सवाल उपस्थित करत आहेत. ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली आहे, अशा नेत्यांना डावलून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता असल्यानं भाजप नेत्यांमधील असंतोष वाढू लागला आहे. तसंच ज्या मतदारसंघांमध्ये भाजप मजबूत स्थितीत आहे, तिथल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात का घेतलं जातं आहे? पक्षाला मजबूत करणार्‍या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष का केलं जातं? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. बाबूल सुप्रियो यांच्या नाराजीमुळंच भाजप नेत्यांनी आसनसोल येथील पांडवेश्‍वर मतदार संघाचे आमदार जितेंद्र तिवारी यांना पक्षात घेण्यास नकार दिला. त्यामुळं तिवारी यांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये जावं लागलं. सुप्रियो यांच्याप्रमाणेच भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये पक्षात सुरू असलेल्या इनकमिंगमुळं नाराजी आहे; परंतु इतर नेते सुप्रियो यांच्याप्रमाणं ताकदवान नाहीत, त्यामुळंच त्यांचं पक्षश्रेष्ठींपुढे काही चाललं नाही. त्यांच्या मतांना केंद्रातील किंवा दिल्लीतल्या भाजप नेत्यांनी फार किंमत दिली नाही. पश्‍चिम मिदनापूर आणि दुर्गापूरमध्ये भाजपमधील जुन्या आणि नव्या नेत्यांवरून कार्यकर्त्यांमध्ये मोठे राडे झाले. या दोन्ही विभागांमध्ये भाजपमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ पोस्टर लावण्यात आलं होतं. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मोहिमेविरुद्ध पोस्टर्सच्या माध्यमातून आवाज उठवला होता. तृणमूल काँग्रेसचे आमदार जितेंद्र तिवारी यांना पक्षात प्रवेश दिल्याबद्दल सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त करणार्‍या आणि तिवारी यांच्या प्रवेशाला विरोध करणार्‍या प्रदेश महासचिव सांयतन बसू आणि महिला मोर्चाच्या प्रमुख अग्निमित्र पाल या दोन भाजप नेत्यांना कारणं दाखवा नोटीस धाडली आहे. 

तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये येणार्‍या नेत्यांना मलईदार पदं सोपवली जात आहेत, त्यामुळं पक्षातील नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तृणमूल काँग्रेसमधून येणार्‍या अनेक नेत्यांना भाजपनं विधानसभेचं तिकीट देण्याचं आश्‍वासन दिलं आहे. त्यामुळं विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मेहनत घेणार्‍या, पक्षबांधणी करणार्‍या भाजप नेत्यांना डावललं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षात सुरू असलेल्या इनकमिंगबद्दल सार्वजनिकरित्या कोणीही काहीही बोलत नसलं तरी इतर पक्षांमधून भाजपमध्ये येणार्‍या नेत्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासल्यास भाजप नेत्यांच्या चिंता अधिक वाढल्या आहेत. नागराकाटा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार सुकरा मुंडा यांना भाजपनं पक्षात प्रवेश दिला आहे; परंतु त्यांच्या मतदार संघात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पहिल्या स्थानावर होता. अशा परिस्थितीत त्यांना पक्षात घेण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मालदा जिल्ह्यातील गाजोल मतदार संघाबाबतही असंच उदाहरण देता येईल. या मतदार संघातील आमदार दीपाली विश्‍वाल यांनाही भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील गाजोल मतदार संघातील भाजपचा परफॉर्मन्स पाहिलात, तर कोणाच्याही लक्षात येईल की, दीपाली यांना पक्षात घेतल्यानं पक्षाला फारफायदा होणार नाही. पुरुलिया मतदार संघातील काँग्रेस आमदार सुदीप मुखर्जी यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर तिथले स्थानिक भाजप नेते म्हणत आहेत, की गेल्या लोकसभा निवडणुकीत पुरुलियामध्ये भाजपला 53 टक्के मतं मिळाली होती, तर काँग्रेसला केवळ 4.6 टक्के मतं मिळाली होती, मग सुदीप यांना पक्षात घेण्याची काय गरज होती? पश्‍चिम बंगालमध्ये गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या दोन कार्यालयांत जोरदार हाणामार्‍या आणि जाळपोळ झाली. भाजप पक्षात अगोदरपासून सक्रिय असणारे आणि पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या पार्श्‍वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधून नव्यानंच दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर हे कार्यकर्ते पोलिसांनाही भिडले. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत तर सात जणांना अटक करण्यात आली आहे. संदीप नंदी यांचा विरोध करणार्‍यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही आमचा घाम गाळून पक्ष उभा केला आहे; परंतु आता मात्र निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तृणमूल काँग्रेसमधून पक्षात आलेल्या लोकांना महत्त्व दिलं जातं आहे.


Name

] ब्रेकिंग,861,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5776,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,208,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,320,sangli,40,satara,153,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10347,औरंगाबाद,365,क्रीडा,678,दखल,707,देश,4448,नाशिक,805,पुणे,746,बीड,1438,बुलडाणा,27,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16479,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13722,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3721,विदेश,651,संपादकी,1,संपादकीय,1554,सातारा,3202,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: फोडाफोडीचं राजकारण अंगलट
फोडाफोडीचं राजकारण अंगलट
https://1.bp.blogspot.com/-daiImGDYf3o/YAwdb_orlxI/AAAAAAABnfU/p0-8-bhaRcQnqEpxANnPKB64AlZQiIHRACLcBGAsYHQ/s320/777.png
https://1.bp.blogspot.com/-daiImGDYf3o/YAwdb_orlxI/AAAAAAABnfU/p0-8-bhaRcQnqEpxANnPKB64AlZQiIHRACLcBGAsYHQ/s72-c/777.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_704.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_704.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content