$type=ticker$snippet=hide$cate=0

बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

बांधकाम व्यावसायिक कोणी दरोडेखोर नाहीत. त्यामुळे त्यांना केलेली मदत ही जणू काही अपात्री पडलेले दान आहे, अशा थाटात माजी मुख्यमंत्री देवेंद्र ...


बांधकाम व्यावसायिक कोणी दरोडेखोर नाहीत. त्यामुळे त्यांना केलेली मदत ही जणू काही अपात्री पडलेले दान आहे, अशा थाटात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे; परंतु केंद्र सरकारनेही बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यांना सवलती दिल्या, तेव्हा मात्र त्यात सामान्यांचे हीत नाही, असे फडणवीस यांना कधीच वाटले नाही.

 राज्यातील बांधकाम व्यवसाय हा मोठा व्यवसाय आहे. त्याचे अर्थकारण फार मोठे आहे. त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे.  गेल्या सहा वर्षांपासून बांधकाम क्षेत्र अडचणीत होते. नोटाबंदी, महारेरा कायदा आणि त्यांनंतरच्या कोरोनामुळे गृहबांधणी क्षेत्रापुढे संकटाच्या मालिकाच उभ्या राहिल्या होत्या. बँकांनी घटविलेले व्याजदर, बांधकाम व्यावसायिकांच्या प्रोत्साहन योजना आणि महाराष्ट्र सरकारने दिलेली मुद्रांक शुल्क याचा परिणाम गृहबांधणी क्षेत्रावर होत असून त्यामुळे तर महाराष्ट्रात गृहबांधणी क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. सध्या पोलाद आणि सिमेंटचे दर वाढत असल्याने बांधकाम उद्योग  क्षेत्र पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अखिल भारतीय बांधकाम व्यावसायिक संघटनेने त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बांधकाम व्यवसायाला मदत करण्याचे आवाहन केले असताना गेल्या दोन महिन्यांत केंद्र सरकारने त्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार काही निर्णय घेत असेल, तर त्याकडे कावीळ झालेल्या दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. काही चुकीचे होत असेल, तर त्यावर अंकुश नक्कीच ठेवायला हवा; परंतु सरकारचा प्रत्येक निर्णय म्हणजे कुणाचे तरी भले करण्यासाठीच आहे, असा त्याचा अर्थ काढणे चुकीचे आहे. कोरोना काळातून गृहबांधणी क्षेत्र बाहेर पडते आहे. त्यातच ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आता मोठ्या घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. आता स्वतःचे घर असावे, असे अनेकांना वाटायला लागले आहे. त्यातच ‘अनलॉक’ प्रक्रियेमुळे कामगार पुन्हा कामावर यायला लागले आहेत. स्थलांतरित मजूर परत आल्याने मुंबई, पुण्यासह अन्य शहरांत भाड्यांच्या घरांनाही मागणी वाढली आहे. मागचे सहा महिने घरांची भाडी 35 टक्क्यांनी कमी झाली होती; परंतु आता ती वाढायला लागली आहेत. मुंबईसह राज्यांत भाडयांच्या घरांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षापेक्षाही ती जास्त आहे. मुद्रांक शुल्कात कपात करूनही राज्याचा महसूल कमी न होता वाढला. त्यामुळे राज्य सरकारचा मागचा निर्णय किती योग्य होता, हे त्यातून दिसले. त्या वेळीही विरोधकांनी त्यावर टीका केली होती. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत गृहबांधणी क्षेत्रासाठी आणखी काही चांगले निर्णय घेण्यात आले. बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने त्याला विरोध केला होता; पण सरकारमधील तीनही पक्षांची चर्चा झाल्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वीच मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्कात 31 मार्च 2021 पर्यंत सवलत देण्यात आली होती. एक जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कात 1.5 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे त्याचा हजारो मालमत्ता खरेदीदारांना फायदा होणार आहे. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क सवलत दिली.  तत्पूर्वी तीन टक्के मुद्रांक शुल्क सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत मर्यादित होती. आता पुन्हा एकदा बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये  पन्नास टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने त्याचा बांधकाम व्यावसायिकांना फायदा होणार आहे. राज्यातील ज्या ठिकाणी 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत, त्या नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य शासनाने ऑगस्ट 2001 मध्ये गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा अस्तित्वामध्ये आणला होता. एक जानेवारी, 2001 च्या पूर्वी झालेल्या गुंठेवारी योजनांना त्याचा लाभ देण्यात आला होता; मात्र ज्या जमिनी अतिक्रमणाखाली आहेत अथवा विशिष्ट क्षेत्रामध्ये आहेत. (ना-विकास क्षेत्र, हरित क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, पर्यावरणदृष्टया संवेदनशील क्षेत्र, संरक्षण विभागाचे क्षेत्र इत्यादी.) त्यांना कायद्याप्रमाणे या योजनेचा लाभ घेता येत नाही. या अधिनियमामुळे राज्यातील बरेच गुंठेवारी क्षेत्र नियमित असले, तरीदेखील अद्यापि काही क्षेत्राचे नियमितीकरण प्रलंबित आहे, त्यामुळे लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्वांचा विचार करून सदर अधिनियमामध्ये अंमलबजावणीची तारीख वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत ज्या ठिकाणी गुंठेवारी योजना झाल्या आहेत; परंतु त्यांचे नियमितीकरण झालेले नाही त्यांना या अधिनियमातील दुरुस्तीचा लाभ घेता येईल. पात्रतेच्या कोणत्याही निकषांमध्ये अथवा अटींमध्ये बदल करण्यात आलेला नाही. फक्त मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने एक सप्टेंबरपासून सहा टक्के असलेल्या मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांपर्यंत कपात केली होती. मुद्रांक शुल्क कमी होताच शहर आणि ग्रामीण भागात दस्त नोंदणी (रजिस्ट्री) वाढल्या होत्या. ग्राहकाला एकूण तीन टक्के सवलत मिळाली. महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला दिलेल्या बुस्टर डोसमुळे या क्षेत्रातील मरगळ जाऊन या क्षेत्रास पुन्हा चालना मिळाली आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहराबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदी करणार्‍यांचे स्वप्न यामुळे पूर्ण झाले. कोरोना आणि टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणार्‍यांनाही मोठा लाभ झाला आहे.

 

मुंबईत डिसेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत नऊ हजार घरांची विक्री झाली होती. नवरात्रापासून आतापर्यंत घरांची विक्री वाढत गेली. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही कौतुक केले. इतर राज्य सरकारांनीही महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. महसूल विभागानं राबविलेलेल्या या योजनेमुळं सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 2019 मध्ये आठ लाख 44 हजार 636 दस्त नोंदणी होऊन महसूल नऊ हजार 254 कोटी रुपये मिळाला होता. 2020 मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 12 लाख 56 हजार 224 दस्त नोंदणी झाली असून नऊ हजार 622 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत 48 टक्के वाढ तर महसुलात 3.97 टक्के वाढ झाली. मुंबई, पुणे या मोठ्या शहरांबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदी करणार्‍यांचे स्वप्न यामुळे पूर्ण झाले. विशेषतः मोठ्या शहरात फ्लॅट खरेदीच्या किंमतीमुळे मुद्रांक शुल्काची रक्कम लाखात भरावी लागत होती. त्यात घट केल्याचा फायदा झाला आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही खीळ बसली होती. कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला मंदीच्या सावटातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी आली आहे.

    

Name

] ब्रेकिंग,851,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5558,letest News,587,Loksabha-2019,164,Maharashtra,104,Mumbai,41,New Window,210,News,316,satara,8,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,139,अहमदनगर,10005,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,664,देश,4172,नाशिक,778,पुणे,608,बीड,1424,बुलढाणा,861,ब्रेकिंग,15444,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,156,महाराष्ट्र,12548,महाराष्ट्र सातारा,31,मुंबई,3458,विदेश,637,संपादकीय,1470,सातारा,3163,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बांधकाम व्यावसायिकांना दिलासा
बांधकाम व्यावसायिकांना दिलासा
https://1.bp.blogspot.com/-mDeacrXnDcA/X_ch7j5HvkI/AAAAAAABm1c/q7Xg1DucXv8WtTWcvXOMlmA6RhJOAUPHQCLcBGAsYHQ/s0/download.jpg
https://1.bp.blogspot.com/-mDeacrXnDcA/X_ch7j5HvkI/AAAAAAABm1c/q7Xg1DucXv8WtTWcvXOMlmA6RhJOAUPHQCLcBGAsYHQ/s72-c/download.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_705.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_705.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content