पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील पोखरी पळसपुर काळेवाडी या वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या छाप्या मध्ये 6050 रुपयांची देशी-विदे...
पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील पोखरी पळसपुर काळेवाडी या वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या छाप्या मध्ये 6050 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे याप्रकरणी चौघांवर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील पोखरी येथे आरोपी शिवाजी निवृत्ती बर्डे राहणार, पोखरी यांनी विनापरवाना बेकायदा 25 लिटर गावठी हातभट्टीची आंबट उग्र वासाची प्रत्येकी 100 रुपये लिटर 2500 रुपये किमतीची दारू तयार केली होती. सदर दारू चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबतची फिर्याद पोकॉ रईस खलील सय्यद त्यांनी दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोखरी येथे आरोपी पंढरी कारभारी पवार, राहणार पोखरी याने विनापरवाना बेकायदा दीड हजार रुपयाची गावठी हातभट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवली होती. त्याविरोधात फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य दिलीप साठे यांनी दिली आहे. त्यावरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळसपूर येथील आरोपी गोरख जनार्दन आहेर (वय 47) यांनी 572 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवली होती, त्या विरोधात फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पाराजी साळवे यांनी दिली आहे काळेवाडी येथील हॉटेल शिवाई चे आडोशाला काळेवाडी सावरगाव ता पारनेर जि . अ.नगर येथे आरोपी हरेष मारुती बेलकर वय 33 रा.काळेवाडी सावरगाव तालुका पारनेर याने हॉटेल शिवाई चे आडोशाला 1478 रु किं ची देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतः चे कब्जात बाळगुन तिची विक्री करताना मिळून आला त्याविरोधात फिर्याद पो कॉ रइस खलील सय्यद यांनी दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौघां आरोपी विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कडूस करत आहेत.