$type=ticker$snippet=hide$cate=0

बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे पाहणीदरम्यान खा. उदयनराजे यांनी केले उद्घाटन

सत्ताधार्‍यांना कॉलर उडवून दाखविला हिसका सातारा / प्रतिनिधी : वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणार्‍या पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे का...

सत्ताधार्‍यांना कॉलर उडवून दाखविला हिसका

सातारा / प्रतिनिधी : वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणार्‍या पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. आता सर्वांना त्याच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लागली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कामाची पाहणी करण्याच्या निमित्ताने तेथे जावून फित कापून बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे कॉलर उडवित उद्घाटन केले. दरम्यान, हे काम शासनाच्या विविध विभागांनी एकत्र येवून केलेले असताना काम पुर्ण झालेले असताना निवडणूकीच्या आचार संहितेचे कारण दाखवून उद्घाटनास विलंब होत असल्याने उदयनराजे यांनी सर्व सत्ताधार्‍यांना उद्घाटन करून हिसका दाखवला. 


सातारा शहरातील पोवई नाक्यावरील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी येथे ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात आले. गेल्या पावणेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले आहे. आता या प्रकल्पाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा उरली होती. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले या ग्रेड सेपरेटरच्या सर्व मार्गिकांची आतून पाहणी करणार असल्याचे सर्व प्रसिध्दी माध्यमांना सांगण्यात आले होते. सातारा विकास आघाडीकडे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाची मागणी सुरू झाल्यानंतर उदयनराजे यांनी लगेचच शुक्रवारी पाहणी करण्याचे नियोजन करण्याचे आदेश सातारा विकास आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यानूसार आज सकाळी 10 वाजता खासदार उदयनराजे यांनी सातारा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या लवाजमासह ग्रेड सेपरेटरच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्यावर पोचले.

तेथे त्यांनी फित कापून ग्रेड सेपरेटरच्या आतमध्ये आपली गाडी नेली. याप्रसंगी सातारा पालिकेच्या नगराध्यक्ष माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व टी ऍण्ड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर उदयनराजे यांनी ग्रेड सेपरेटरी पाहणी केली. ग्रेड सेपरेटरचे काम 60 कोटी रुपयांचे होते. मात्र, गोडोलीकडे जाणार्‍या मार्गाचे अधिक काम करण्यात आले. त्यासाठी अतिरिक्त 15 कोटी रुपयांचा निधी लागल्याने संपूर्ण काम 75 कोटींवर गेले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली.

काम पुर्ण झालेले असताना ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची जिल्ह्यात सर्वत्र धामधूम सुरु आहे.  अशा परिस्थितीत वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी बनविलेल्या ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनास नेत्यांसह अधिकार्‍यांना कधी वेळ मिळणार? असा अनुत्तरीत सवाल उपस्थित झाला होता. राष्ट्रवादीने तर सातारा पालिकेच्या निवडणूकीत पॅनेल टाकण्याची घोषणा केली होती. याचाच उट्ट्या काढण्यासाठी महाविकास आघाडीसह भाजपचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यांसह सर्वांना गाफिल असल्याचे पाहून गनिमी काव्याने ग्रेड सेपरेटरच्या कामाचे उद्घाटन करून उदयनराजे भोसले मोकळे झाले. सर्व सत्ताधार्‍यांना गाफिल ठेवण्यात उदयनराजे भोसले यांना यश आल्यामुळे त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने कॉलर उडवून आपला सातारी हिसका दाखवला अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. 

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10043,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4199,नाशिक,779,पुणे,626,बीड,1425,बुलडाणा,3,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15554,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12666,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3489,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे पाहणीदरम्यान खा. उदयनराजे यांनी केले उद्घाटन
बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे पाहणीदरम्यान खा. उदयनराजे यांनी केले उद्घाटन
https://1.bp.blogspot.com/-ZVICMK8Jk0g/X_h0tj20u7I/AAAAAAABm3Y/gVmp35jaj8YvhgHYwWhcHIt132WXoFb2ACLcBGAsYHQ/s320/Udyanraje.jpg
https://1.bp.blogspot.com/-ZVICMK8Jk0g/X_h0tj20u7I/AAAAAAABm3Y/gVmp35jaj8YvhgHYwWhcHIt132WXoFb2ACLcBGAsYHQ/s72-c/Udyanraje.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_719.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_719.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content