नवी दिल्ली : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. लवकरच ...
नवी दिल्ली : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. लवकरच लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार असून या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लस टोचून घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस दिली जाणार असल्याचे समजते. तसेच पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातील आणखी काही नेतेही लस घेणार आहेत. सामान्य लोकांमध्ये लसीबाबत विश्वास आणि जनजागृती पसरवण्यासाठी पंतप्रधान आणि इतर नेते लस टोचून घेणार असल्याचे समजते.