म्हसवड / वार्ताहर : म्हसवड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी धनाजी रामचंद्र माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी...
म्हसवड / वार्ताहर : म्हसवड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी धनाजी रामचंद्र माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी जाहीर करताच माने यांच्या शेकडो समर्थकांनी पालिकेबाहेर हलगीचा कडकडाट व फटाक्याचा धडधडाट उडवुन देत एकच जल्लोष केला.
पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा दि. 21 जानेवारी रोजी राजिनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी गटनेते धनाजी माने यांनी पालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटाशी चर्चा करुन सर्वां
चा आपल्याला पाठींबा कागदोपत्री घेतला होता. धनाजी माने यांच्या या पत्रावरुन नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी उपनगराध्यक्ष पदाची विशेष बैठक आयोजित करुन बैठकीचा अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठवल्याने जिल्हाधिकार्यांनी दि. 28 रोजी म्हसवड पालिकेत उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार दि. 28 रोजी पालिकेत उपाध्याय निवडीसाठी सत्ताधारी गटाकडून धनाजी माने यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
याचवेळी पालिकेतील विरोधी गटाकडूनही एक अर्ज दाखल करण्यात आल्याने उपाध्यक्ष निवडीत रंगत निर्माण झाली. मात्र, ही रंगत फार काळ न राहता ऐनवेळी विरोधी पक्षाकडून भरण्यात आलेला अर्ज माघारी घेण्यात आल्याने उपाध्यक्ष पदासाठी धनाजीमाने यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी धनाजी रामचंद्र माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
पालिकेतील विरोधी गट व सत्ताधारी गट एकत्र पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी धनाजी माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वीच सत्ताधारी व विरोधी अशा दोन्हीकडील सदस्यांशी चर्चा केली होती. त्यासाठी दोन्ही गटाने यापूर्वीच धनाजी माने यांना आपला पाठींबा दर्शिवला होता. त्यामुळे धनाजी माने यांच्यासाठी पालिकेतील दोन्ही गट एकत्र आल्याचे दिसून आले.
यापुढील कार्यकाळ फक्त म्हसवडकर जनतेसाठीच उपनगराध्यक्ष पदी धनाजी माने यांची निवड झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आपल्यावर सर्वच सदस्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहेच, पण खरे आभार मला म्हसवडकर जनतेचे मानायचे असून त्यांनी आजवर जो विश्वास माझ्यावर दाखवल्यानेच मी नगरसेवक होवु शकलो. आता यापुढील कार्यकाळ हा फक्त जनतेसाठीच राहणार असुन या काळात म्हसवड शहरातील प्रलंबीत विकास कामे मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेवुन काम करणार.