परभणी : परभणीत जिल्ह्यातील मुरूंबा येथे तब्बल ८०० कोंबड्यांचा 'बर्ड फ्लू'मुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या कोंबड्यांचा मृ...
परभणी : परभणीत जिल्ह्यातील मुरूंबा येथे तब्बल ८०० कोंबड्यांचा 'बर्ड फ्लू'मुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या कोंबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'मुळेच झाल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेले असताना आता महारा
ष्ट्रातही 'बर्ड फ्लू'चा धोका वाढला आहे. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली तो बचत गटाच्या वतीने चालवला जातो. या पोल्ट्री फॉर्ममध्ये तब्बल ८००० हजार कोंबड्या असून त्यापैकी ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. मुरुंबा गावाच्या एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. तसेच दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.