$type=ticker$snippet=hide$cate=0

टिकैत यांच्या अश्रूंची भाजपला मोजावी लागेल किंमत

शेतकरी आंदोलन चिरडून काढण्याचा भाजपनं अनेकदा प्रयत्न करूनही त्याला यश आलं नाही. प्रत्येक प्रयत्नांतून आंदोलनाला बळ मिळत गेलं. प्रजासत्ताक दि...

शेतकरी आंदोलन चिरडून काढण्याचा भाजपनं अनेकदा प्रयत्न करूनही त्याला यश आलं नाही. प्रत्येक प्रयत्नांतून आंदोलनाला बळ मिळत गेलं. प्रजासत्ताक दिनी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळं शेतकरी बॅकफूटवर गेल्याचा फायदा भाजप उठविणार, हे स्पष्ट होतं. झालंही तसंच; परंतु पोलिसांसह सर्व यंत्रणा ताब्यात असलेल्या सरकारला राकेश टिकैत यांच्या अश्रूंपुढं नमतं घ्यावं लागलं आहे. 


अश्रू दोन प्रकारचे असतात. एक दुःखानं आलेले आणि दुसरे आनंदाश्रू. अश्रूत मोठी ताकद असते, ती वारंवार प्रत्ययाला येत असते. अश्रूत काहींना फक्त पराभूत मनोवृत्ती दिसते; परंतु अश्रूत राज्य उलथवण्याची ताकद असते. तशी ताकद किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांच्याही अश्रूत दिसली. केंद्र सरकारनं केलेले तीनही कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांना दिल्लीच्या हिंसक घटनांमुळं बॅकफूटवर जावं लागलं. आतापर्यंत शेतकर्‍यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारनं अनेकदा प्रयत्न केला. फूट पाडण्याचं षडयंत्र रचलं; परंतु सरकारला फोडा आणि झोडा या नीतीतून यश मिळालं नाही. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारामुळं काही संघटनांनी अन्य संघटनांच्या नेत्यांवर आरोप करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शेतकरी संघटनांचे नेते एकमेकांवर आरोप करायला लागले. हे पाहून सरकारला मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. आंदोलन चिरडणं सोपं जाईल, अशी स्वप्नं सरकारला पडायला लागली. आंदोलनस्थळाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. शेतकर्‍यांना कुठूनही मदत मिळणार नाही, बाहेरून कुणी येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. हरयाणातील भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलनस्थळी पाठवून तिरंग्याचा अपमान कधीही सहन करणार नाही, असं सांगून आंदोलनस्थळ सोडा, असा इशारा द्यायला लागले. हरयाणात भाजपचं सरकार आहे. दिल्लीला हरयाणाची सीमा लागून आहे. मनोहराल खट्टर यांनी आंदोलकांवर कसा दबाव आणला, हे प्रतिभा शिंदे यांनी सांगितलंच आहे. खट्टर यांनी दबाव आणून आंदोलकांची रसद कशी तोडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ग्रामपंचायती आंदोलनाला मदत केली, तर निधी थांबवू, असा इशारा देऊन झाला. त्याचा थोडा परिणाम झाला. वास्तविक लाल किल्ल्यावर इतर झेंडा फडकावताना तिंरग्याचा कुठंही अवमान झाला नाही; परंतु राष्ट्रपती रामनाथ कोविंद जिथं अभिभाषणात तिरंग्याचा अवमान झाल्याचं सांगतात, तिथं सरकारची भूमिका काय हे वेगळं सांगायला नको. शेतकरी आंदोलनातील नेत्यांवर सरकारनं कारवाईचा बडगा उगारल्यामुळं आंदोलन विरून जाईल, हा सरकारसह अनेकांनी वर्तवलेला अंदाज साफ खोटा ठरला आहे. भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकैत यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी प्राण त्यागण्याची भाषा केली. आंदोलनस्थळी ते ढसढसा रडले. गाझीपूरमध्ये ठिय्या धरून बसलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी केंद्र सरकार कसून प्रयत्न करत असल्याबद्दल टिकैत यांचा बांध फुटल्यामुळं उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पूर्व राजस्थानातील आंदोलकांचा निर्धार अधिक पक्का झाला. सरकारच्या कारवाईमुळं उलट या आंदोलनात नवीन प्राण फुंकले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकर्‍यांना ठार मारण्याचा कट रचत आहे, हे सांगताना टिकैत यांना अश्रू अनावर झाल्याचं दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला.  हे सरकार शेतकर्‍यांना नाहीसं करून टाकेल, भाजपचे गुंड येतील आणि पोलिसांसह शेतकर्‍यांवर हल्ला करतील, असं टिकैत म्हणत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आपण छातीवर गोळ्या झेलण्यास तयार आहोत किंवा आंदोलनस्थळी गळफास घेण्यास तयार आहोत, असं टिकैत म्हणाले. टिकैत यांच्या या भावनिक भाषणाचा शेतकर्‍यांवर योग्य तो परिणाम झाला. दिल्ली, मिरत, बागपत, बिजनौर, मुझफ्फरनगर, मुरादाबाद आणि बुलंदशहर या लगतच्या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी आंदोलक शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर येथे आले.

प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्च्याला हिंसक वळण लागल्यामुळं आंदोलकांचं मनोधैर्य खालावल्यासारखं वाटत होतं; पण आता हे आंदोलन पुन्हा निश्‍चयानं सुरू झाल्यासारखं वाटतं आहे. केंद्र सरकारनं कारवाईचा धडाका लावूनही शेतकर्‍यांचं मनोधैर्य कायम आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांनी काढलेला ट्रॅक्टर मोर्चा काही ठिकाणी हाताबाहेर गेल्यामुळं, तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून चाललेला निषेध मोडून काढण्याची, नामी संधी गवसल्यासारखं केंद्र सरकारला वाटलं. हे आंदोलन बेकायदा आहे, हे सांगण्यासाठी नियोजित मोहीम सरकारतर्फे राबवली जाऊ लागली. बहुसंख्य बोटचेप्या टीव्ही वाहिन्यांनी तर हे शेतकरी आंदोलन नसून फुटीरतावाद्यांनी घातलेला गोंधळ आहे असा धोशा लावला होता. हिंसक घटना झाल्यानंतर काही तासांच्या आत दिल्ली पोलिसांनी, या आंदोलनानं शांततेत नेतृत्व करणार्‍या 25 हून अधिक नेत्यांविरोधात, दंगलखोरी, कट रचणं आणि यासारखे अनेक गंभीर गुन्हे लावून फिर्यादी दाखल केल्या. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी टिकैत यांना अटक करण्यासाठी गाझीपूर ठिय्या आंदोलनस्थळ भल्यामोठ्या सुरक्षा यंत्रणेसह कडेकोट बंद केलं होतं. 144वं कलम (जमावबंदी) लागू करण्यात आलं होतं आणि शेतकर्‍यांना जागा रिकामी करण्याचा इशारा देण्यात आला होता. शेतकर्‍यांना पळवून लावण्याच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी या भागातील भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्यांसह जमले होते. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर गाझीपूर इथं तणाव कायम असताना, रात्रभरात ठिय्या देऊन बसलेल्या आंदोलकांची संख्या वाढली. आणखी हजारो शेतकरी दिल्ली-मिरत महामार्गावरून आंदोलनस्थळी निघालेले दिसत होते. शुक्रवार दुपारपर्यंत गाझीपूर हे आंदोलक शेतकर्‍यांची सर्वाधिक संख्या असलेल्या स्थळांपैकी एक झाले. टिकैत यांना पाठिंबा देणार्‍यांची संख्या वाढत असल्याचं बघून, गुरुवारी रात्री पोलिसांना सुरक्षाव्यवस्था काढून घेणं भाग पडलं. काही तासांतच राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांनी भारतीय किसान युनियनला पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय लोकदल आता आपला प्रभाव असलेल्या पश्‍चिम उत्तर प्रदेशातून शेतकर्‍यांना पाठिंबा मिळवण्याच्या कामाला लागलं आहे. ‘शेतकर्‍यांसाठी हा जीवन-मरणाचा प्रश्‍न झाला आहे; पण चिंता करू नका. सर्वांनी एकत्र राहणं आवश्यक आहे, हा अजित साहेबांचा संदेश आहे‘ अशा आशयाचं ट्वीट राष्ट्रीय लोकदलाच्या उपाध्यक्षांनी केलं आहे. अजित सिंग यांचे पुत्र जयंत चौधरी यांनीही गाझीपूरला धाव घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. टिकैत यांना ज्या प्रकारे पाठिंबा मिळत आहे, ते भाजपची चिंता वाढवणारं आहे. दिवंगत महेंद्रसिंह टिकैत यांचे धाकटे पुत्र राकेश टिकैत यांची पश्‍चिम उत्तर प्रदेशातील जाटांचं वर्चस्व असलेल्या भागांवर उत्तम पकड आहे. जाट व मुस्लिमांमध्ये खोल दरी निर्माण करणार्‍या 2013 मधील मुझफ्फरनगर दंगलीनंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये टिकैत व त्यांचे थोरले बंधू नरेश टिकैत यांनी भाजपला व त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाला पाठिंबा दिला आहे. पश्‍चिम उत्तर प्रदेश भाजपच्या प्रभावाखाली आणण्यात जाटांचा मुख्य वाटा आहे. जाटांच्या जोरावरच भाजपनं राष्ट्रीय लोकदल, समाजवादी पक्ष  बहुजन समाज पक्ष यांसारख्या पारंपरिक पक्षांना या प्रदेशातील निवडणूक नकाशावरून साफ पुसून टाकलं आहे. हे पाहता शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशात बसण्याची शक्यता आहे.

पश्‍चिम उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेल्या गाझीपूर येथील आंदोलन आत्तापर्यंत टिकरी व सिंघू सीमांवरील ठिय्या आंदोलनांच्या तुलनेत सौम्य होतं; मात्र गाझीपूरवर रात्री उशिरा कारवाई करण्याच्या योजनेचा परिणाम म्हणून आता पश्‍चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात आघाडीच्या स्थानी आले आहेत. गुरुवार संध्याकाळपर्यंत ज्या पद्धतीनं घटना होत गेल्या, ते बघता पश्‍चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी भाजपच्या विरोधात एकत्र येतील अशी दाट शक्यता दिसत आहे. शेतीशी संबंधित अनेकविध मुद्दयांवरून महेंद्रसिंह टिकैत यांनी 1988 साली राजीव गांधी सरकारच्या विरोधात लाखो शेतकरी राजधानीत एकत्र आणले होते. याच इतिहासाची पुनरावृत्ती त्यांचे पुत्र राकेश टिकैत करताना दिसत आहेत. माजी पंतप्रधान चरणसिंह यांनी 1970 आणि 1980च्या दशकात ज्या पद्धतीचं कृषीआधारित राजकारण उभं केलं होतं, त्याच पद्धतीचं कृषीआधारित राजकारण पश्‍चिम उत्तर प्रदेशात उभं करण्याची संधी सरकारच्या कारवाईमुळे टिकैत यांच्या हाती लागली आहे. टिकैत यांच्यावरून आता भाजपमधील नेत्यांमध्ये जुंपली आहे. लोणीचे आमदार नंद किशोर गुर्जर यांची हकालपट्टी करण्याची मागणी पक्षातून होतं आहे. टिकैत हे कृषी कायद्यांविरोधात गाझीपूर सीमेवर धरणं आंदोलन करत आहेत. आमदार गुर्जर यांनी भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी शेतकर्‍यांना चिथावलं. यापूर्वीही लोणीच्या आमदारानं पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी विरोधी नेत्यांसमवेत विधानसभेबाहेर धरणं आंदोलन केलं होतं. टिकैत यांनी भाजपचे दोन्ही आमदार नंद किशोर गुर्जर आणि सुनील शर्मा यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला होता, असं लोणी भाजपच्या अध्यक्ष रंजीता धामा म्हणाल्या. यामुळंच टिकैत पुन्हा धरणं आंदोलनाला बसले; पण आपण गाझीपूर सीमेवर गेलोच नाही, असा दावा गुर्जर करत आहेत. तसंच 26 जानेवारीच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर टिकैत यांच्यासह योगेंद्र यादव यांच्यासारख्या शेतकरी नेत्यांना फाशी देण्याची मागणी करणारं त्यांचं एक पत्र व्हायरल होतं आहे. टिकैत याआधी शांततेत शरण येण्याची तयारी दर्शवली होती; पण आमदार गुर्जर आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांना शरण न जाण्याचा निर्णय घेतला, असं आता लोणी भाजपच्या अध्यक्ष रंजीता धामा यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे. टिकैत पोलिसांना शरण येण्यास तयार असताना गाझीपूर सीमेवर आंदोलनाच्या ठिकाणी 500-700 आंदोलक होते; पण आमदार नंद किशोर यांनी जाणीवपूर्वक त्याचं रुपांतर हजारोंच्या गर्दीत केलं. आगामी विधानसभा निवडणुकीत गुर्जर यांना समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवायची आहे, म्हणूनच ते सरकारला पोखरण्याचा कट सतत रचत आहेत, असा आरोप धामा यांनी पत्रात केला आहे. आंदोलनात फूट पाडण्याऐवजी कमलदलंच परस्परांशी वितंडवाद घालायला लागले आहेत.


Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5734,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,187,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,124,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10277,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,700,देश,4415,नाशिक,801,पुणे,724,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16294,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13513,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3658,विदेश,650,संपादकीय,1540,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: टिकैत यांच्या अश्रूंची भाजपला मोजावी लागेल किंमत
टिकैत यांच्या अश्रूंची भाजपला मोजावी लागेल किंमत
https://1.bp.blogspot.com/-N8tOABcJpic/YBVX3tGr5aI/AAAAAAABnvA/MAoLROIQP9IrGLYjJuh6tj6sZTNYGuzZwCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-N8tOABcJpic/YBVX3tGr5aI/AAAAAAABnvA/MAoLROIQP9IrGLYjJuh6tj6sZTNYGuzZwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_740.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_740.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content