सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांनी ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील एक महिन्यापासून...
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांनी ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील एक महिन्यापासून साताऱ्यातील डायलिसिस सेंटरमध्ये उपचार घेत होते. आज पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कराड दक्षिण मतदारसंघाचे सलग ३५ वर्षे त्यांनी प्रतिनिधित्व केले. विलासकाका पाटील उंडाळकर यांचा जन्म १५ जुलै १९३८ रोजी झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण उंडाळे गावात, तर माध्यमिक शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. विलासकाका उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण हे एकमेकांचे कट्टर विरोधक होते हे सर्वज्ञात आहे. परंतु दोन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दिलजमाई झाली होती.
विलासकाकांची राजकीय कारकीर्द
जिल्हा परिषद सदस्य : १९६७ ते १९७२
शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य
सातारा जिल्हा मध्यवती बँक (१९६७ ते आजअखेर संचालक)
अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा
सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लड, जर्मन, फ्रान्स, थायलंड दौरा
कराड दक्षिण मतदारसंघाचे १९८० ते २०१४ पर्यंत सलग ३५ वर्षे आमदार
दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री १९९१ ते १९९३
विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री १९९९ ते २००३
सहकार व वस्त्रोद्योगमंत्री २००३ ते २००४
महाराष्ट्र शासनाचा चीन अभ्यास दौरा २००८
उंडाळकर यांचे उपक्रम
- १९७५ पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन
- समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलन
- देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची निर्मिती
- जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती
- राज्यात मतदारसंघ विकासात अव्वल
- डोंगरी विकास निधीचे शिल्पकार
निवडणुका
जिल्हा परिषद १९६७ ते १९७२
सातारा जिल्हा बँक १९६८ ते आजअखेर
लोकसभा १९७९ - तालुक्यातून ३३ हजारांची आघाडी
विधानसभा १९८०-८५ : २१ हजार मतांनी विजयी
विधानसभा १९८५-९० : १४ हजार मतांनी विजयी
विधानसभा १९९०-९५ : ३२ हजार मतांनी विजयी
विधानसभा १९९५-९९ : २१ हजार मतांनी विजयी
विधानसभा १९९९-०४ : २३ हजार मतांनी विजयी
विधानसभा २००४-०९ : १ लाख मतांनी विजयी
विधानसभा २००९-१४ : १५ हजार मतांनी विजयी
विकसित केलेल्या संस्था :
1. कोयना सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, कराड
2. कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ लिमिटेड
3. शेती उत्पन्न बाजार समिती, कराड
स्थापन केलेल्या संस्था
1. ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे
2. स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, उंडाळे
3. कोयना सहकारी बँक लिमिटेड, कराड
4. रयत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, शेवाळेवाडी
परिषदा :
1. धर्मांध परिषद, मौजे तांबवे, ता. कराड.
2. शैक्षणिक चिंतन परिषद, कराड.
3. विज्ञान परिषद, कराड.
4. डोंगरी परिषद, काळगाव, ता. पाटण.
5. घटना बचाव परिषद, कराड.