मुंबई / प्रतिनिधी : मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किट झाले; मात्र वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. मंत्रालयाच्या जुन्या अने...
मुंबई / प्रतिनिधी : मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किट झाले; मात्र वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. मंत्रालयाच्या जुन्या अनेक्स इमारतीच्या चौथ्या मजल्यावर हे शॉर्ट सर्किट झाले. रोहित्र जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या दालनात अंधार आहे.
वीज गेल्याने अनेक विभागाची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, सध्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मंत्रालयात याआधीदेखील शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे 2012 साली भीषण आग लागली होती. त्यानंतर 30 मार्च 2020 रोजीदेखील भीषण आगीची घटना घडली होती. मंत्रालय हे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख वास्तू आहे. तिथे सर्व विभागांची कामे चालतात. लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कामे केली जातात; मात्र अशा ठिकाणी वारंवार शॉर्ट सर्किटसारख्या घटना घडणे ही चिंतेची बाब आहे