नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचा (डीआरडीओ) आज ६३वा स्थापना दिन आहे. यानिमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुभेच...
नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचा (डीआरडीओ) आज ६३वा स्थापना दिन आहे. यानिमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुभेच्छा दिल्या. देशाला खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भर' बनवण्यात डीआरडीओचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी तयार केलेल्या विविध संशोधनांचा देशाला गर्व आहे, असे ते यावेळी म्हणाले.
या वर्धापन दिनानिमित्त डीआरडीओच्या सर्व सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा, अशा आशयाचे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले होते. यासोबतच त्यांनी सर्वांना २०२१ नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. या दिवसानिमित्त डीआरडीओने देशामध्येच अधिकाधिक प्रगत संरक्षण तंत्रज्ञान तयार करण्याचा निर्धार केला. डीआरडीओ ही देशाच्या संरक्षण विभागाची संशोधन आणि विकास शाखा आहे. सध्या डीआरडीओ अधिकाधिक संरक्षण विषयक संशोधने देशामध्येच करुन, क्षेपणास्त्रे आणि इतर संरक्षक उत्पादनांसाठी इतर देशांवर अवलंबून न राहण्याचे डीआरडीओचे उद्दिष्ट आहे. १९५८मध्ये केवळ १० लहानश्या प्रयोगशाळांमधून सुरू झालेल्या डीआरडीओचा आता मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. देशभरात डीआरडीओच्या कित्येक प्रयोगशाळा आणि कारखाने आहेत.