$type=ticker$snippet=hide$cate=0

कराड दक्षिणेत भाजपाची सरशी तर उत्तरेत पालकमंत्र्यांना झटका

 तांबवे, नांदगाव, कालवडे, खोडशी, पार्ले,  बनवडी, पाल, चोरे, विशाल पाटील/ कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची...

 तांबवे, नांदगाव, कालवडे, खोडशी, पार्ले,  बनवडी, पाल, चोरे,
विशाल पाटील/ कराड / प्रतिनिधी : कराड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी झाली. अनेक गावांमध्ये तालुका पातळीवरील वेगवेगळ्या नेत्यांचे नेतृत्व माननार्या संमिश्र पॅनेल्सनी विजय मिळवला. कराड दक्षिणेतील कार्वे, काले, शेणोली, शेरे, वाठार, गोळेश्वर, खुबी, नांदगाव, शिंदेवाडी ग्रामपंचायतीवर भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या गटाने विजय मिळवला. तर जखिणवाडी, पोतले, मालखेड, साळशिरंबे, घारेवाडी, वहागाव ग्रामपंचायतीवर स्व. विलासराव पाटील-उंडाळकर व आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणार्‍या पॅनेल्सनी विजय मिळवला. तर विंग येथे डॉ. अतुल भोसले व आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी एकत्र येत उंडाळकर यांच्या गटाला धक्का देत सत्तांतर घडवले. सैदापूर ग्रामपंचायतीकडे सगळ्यांच्या नजरा लागून होत्या. फत्तेसिंह जाधव यांच्या पॅनेलने सर्वपक्षीय लोकशक्ती विकास आघाडीवर विजय मिळवला. कराड उत्तरेत सहकार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हजारमाची, उंब्रज, वडगाव उंब्रज, निगडी ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. बनवडीत सहकार मंत्र्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे शंकरराव खापे बापू यांच्या 30 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावत सर्व पक्षीय जनशक्ती आघाडीने विजय मिळवला. पाल या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसेच तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती देवराज पाटील यांच्या पॅनेलवर भाजपच्या नेतृत्वाखाली सुरेश पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला. चोरे येथे सहकार मंत्र्यांच्या गटाला भोपळाही फोडता आला नाही. तेथे बाबासाहेब चोरेकर यांच्या पॅनेलने 9 जागावर विजय मिळवत एकहाती सत्ता घेतली.
तालुक्यातील 104 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 17 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 87 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. कराडच्या रत्नागिरी गोदामात सोमवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमुळे दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणीच्या नऊही फेर्या पूर्ण झाल्या. तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्‍या कराड दक्षिणमधील सैदापूर ग्रामपंचायतीत फत्तेसिंह जाधव यांच्या पॅनेललने बहुमत मिळवत 9 जागा जिंकल्या तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील, डॉ. अतुल भोसले, ऍड. उदयसिंह पाटील नेतृत्वाखालील सर्वपक्षीय लोकशक्ती विकास आघाडीला 8 जागा मिळाल्या. काले गावात ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांचे नेतृत्व माननार्या पॅनेलने जोरदार मुसंडी मारत 14 जागांवर यश मिळवले. काका-बाबा यांचे नेतृत्व माननार्या पॅनेलला 3 जागा मिळाल्या. नांदगावमध्ये दहा वर्षाच्या सत्तेला डॉ. अतुल भोसले गटाने सुरूंग लावला. सुकरे गुरूजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेलने 6 जागा जिंकल्या. तर टी. के. पाटील, सागर कुंभार यांच्या लोकशाही पॅनेलने 5 जागा जिंकल्या. कार्वेमध्ये भोसले यांच्या नेतृत्वाखाली धर्मराज सिध्देश्वर पॅनेलने काका-बाबा गटाच्या धानाई देवी यशवंत ग्रामविकास पॅनेलचा 10 विरूध्द 7 असा पराभव केला. चचेगाव येथे भोसले-उंडाळकर गटाने 7 जागावर विजय मिळवला. तर अविनाश मोहिते व पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाने 4 जागावर विजय मिळवला. जखिणवाडीत आ. पृथ्वीराज चव्हाण गटाचे सरपंच नरेंद्र पाटील गटाने 7 जागांवर विजय मिळवला तर विरोधक डॉ. अतुल भोसले यांच्या गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. बेलवडे बुद्रुक येथे भोसेल-उंडाळकर गटाने एकत्र येत 8 जागा जिंकल्या तर विरोधक अविनाश मोहिते गटाला 3 जागा मिळाल्या. मालखेड येथे काका-बाबा गटाने सत्ता ताब्यात ठेवून 7 जागा जिंकल्या तर विरोधक भोसले गटाला 2 जागा मिळाल्या. कालवडे येथे पृथ्वीराज चव्हाण व डॉ. अतुल भोसले गटाने एकत्र येत 15 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावत 9 जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडविले. तर विरोधक उंडाळकर गटाला 4 जागा मिळाल्या. जिंती येथे चव्हाण-भोसले गटाने एकत्र येत 6 जागा जिंकल्या तर विरोधक उंडाळकर गटाला 3 जागा मिळाल्या. साळशिरंबे येथे काका-बाबा गटाने एकत्र येत भोसले गटाचा 9 विरूध्द 0 असा क्लिन स्वीप विजय मिळवला. वाठार येथे अतुल भोसले गटाने बहुमत मिळवत 7 जागा जिंकल्या तर विरोधक काका-बाबा गटाने 4 जागा जिंकल्या.
कराड उत्तरमधील हजारमाचीत राष्ट्रवादी तसेच राष्ट्रीय कॉंग्रेसला संमिश्र यश मिळाले आहे. उंब्रज येथे कॉंग्रसची सत्ता कायम राहिली आहे. राष्ट्रवादी समर्थक सह्याद्री पॅनेल 13 जागांवर विजय मिळाला आहे. तर भैरवनाथ पॅनेलला 2 जागा तर भैरवनाथ जनविकास परिवर्तन पॅनेलला 2 जागा मिळाल्या आहेत. चोरे ग्रामपंचायतीत बाबासाहेब चोरे यांच्या पॅनेले सर्वच्या सर्व 9 जगा जिंकल्या. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला भोपळाही फोडता आला नाही. कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीत कॉंग्रेसने जोरदार टक्कर दिली आहे. हिंदूराव चव्हाण यांचे पुतणे शैलेश चव्हाण यांच्या गटाने 7 जागांवर विजय मिळवला आहे तर सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसल 8 जागांवर विजय मिळाला. खोडशीमध्ये सत्तांतर घडवत माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग चव्हाण यांच्या पॅनेलला 8 जागावर विजय मिळवला तर सर्वपक्षीय विरोधकांना 3 जागेवर समाधान मानावे लागले. चिखली येथे अजितराव पाटील व भाऊसाहेब चव्हाण यांच्या आघाडीने विजय मिळवत 6 जागा जिंकल्या तर विरोधक कुलदीप क्षीरसागर यांच्या पॅनेलने 3 जागावर विजय मिळवला. वडोली निळेश्वर येथे अटीतटीच्या लढतीत सर्वपक्षीय पॅनेलने 5 जागा जिंकल्या तर विरोधक शंकरराव पवार यांच्या लोकशक्ती पॅनेलने 4 जागा जिंकल्या. कोणेगाव येथे काका-बाबा गटाने एकत्र येत राष्ट्रवादीविरोधात 6 विरूध्द 3 असा विजय मिळवला. बनवडीत सहकारमंत्र्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे खापे बापू यांच्या 30 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावत सर्व पक्षीय जनशक्ती आघाडीने 9 विरूध्द 4 असा विजय मिळवला. पेरले येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता कायम राहिली असून सर्वच्या सर्व 17 जागांवर राष्ट्रवादी समर्थकांनी विजय मिळवला आहे. पार्ले ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थक पॅनेलचा पराभव झाला आहे. कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश नलवडे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी समर्थक पॅनेलला 3 जागा मिळाल्या आहेत. सुर्लीत अटीतटीची लढत झाली. हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या बहुमत सिध्द करत पॅनेलने 5 जागा जिंकल्या तर विरोधक भाजपचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलने 4 जागा जिंकल्या.
तांबवे येथे ना. शंभूराज देसाई व ऍड. उदयसिंह पाटील समर्थक जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील गटाने परिवर्तन घडवत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसून या गटाला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागते आहे. तर प्रदीप पाटील गटाला 8 जागा मिळाल्या आहेत.

कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष
विजयी उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत गुलालाची उधळण, फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष केला. मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, नायब तहसीलदार देवकर, माने यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली.






दक्षिणेत भाजपचाच करिष्मा

कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांच्या माध्यमातून भाजपने कार्वे, काले, शेणोली, शेरे, गोळेश्वर, खुबी, वाठार, नांदगाव, शिंदेवाडी ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. कृष्णा कारखान्याची होणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कराड दक्षिणमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीत चुरस वाढली होती. मात्र, भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी पुन्हा एकदा कृष्णा काठावर आपलीच सत्ता असल्याचे सिध्द केले आहे.
..................

Name

] ब्रेकिंग,860,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,4,Latest News,5763,letest News,598,Loksabha-2019,164,Maharashtra,197,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,38,satara,141,satara.,4,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10326,औरंगाबाद,364,क्रीडा,678,दखल,705,देश,4439,नाशिक,805,पुणे,741,बीड,1438,बुलडाणा,25,बुलढाणा,877,ब्रेकिंग,16426,ब्रेकिंग न्युज,117,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13666,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3703,विदेश,650,संपादकी,1,संपादकीय,1550,सातारा,3200,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कराड दक्षिणेत भाजपाची सरशी तर उत्तरेत पालकमंत्र्यांना झटका
कराड दक्षिणेत भाजपाची सरशी तर उत्तरेत पालकमंत्र्यांना झटका
https://1.bp.blogspot.com/-7XwyPPYdcsE/YAV6rdc09OI/AAAAAAABnPI/-HvtkZA2nKo0PB85blNQ9wTbQTOBC7uwQCLcBGAsYHQ/s320/KRD%2B1.jpg
https://1.bp.blogspot.com/-7XwyPPYdcsE/YAV6rdc09OI/AAAAAAABnPI/-HvtkZA2nKo0PB85blNQ9wTbQTOBC7uwQCLcBGAsYHQ/s72-c/KRD%2B1.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_752.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_752.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content