सातारा / प्रतिनिधी : महाडिबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांचे सन 20...
सातारा / प्रतिनिधी : महाडिबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांचे सन 2018-19 व 2019-20 मधील मंजूर शिष्यवृत्तीची रक्कम आधार कार्ड अद्ययावत नसणे तसे आधार बँक खत्याशी संलग्न नसल्या कारणाने शिष्यवृत्ती मंजूर होवुनही प्रलंबित आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करुन घेऊन कागदपत्रांची पुर्तता करुन करुन या कार्यालयाकडे मंजुरीसाठी तात्काळ पाठवावेत, अशा सुचना सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिल्या.
सातारा जिल्ह्यातील 351 महाविद्यालयाचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
सन 2019-20 मधील एकूण 3033 विद्यार्थ्यांचे अर्ज दुसर्या हप्त्यासाठी अल्पाय करण्यात आले नाहीत. त्यामुळे दुसर्या हप्त्याची रक्कम विद्यार्थी, महाविद्यालयांच्या खात्यावर वर्ग होणर नाही. त्यासाठी महाविद्यालयांनी दुसर्या हप्त्यासाठी अल्पाय करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. शैक्षणिक वर्ष 2020-12 या वर्षामध्ये महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 3 डिसेंबर 2020 पासून सुरु झली आहे. याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देवुन विद्यार्थ्यांकडुन अर्ज भरुन घ्यावेत. महाविद्यालयाने कार्यवाही न केल्यास व त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचार्यांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल असेही सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी सांगितले.