वाहनाच्या धडकेत जखमी बिबट्याची धूम पाचवड फाटा नांदलापूर परिसरातील नागरिकांच्यात घबराट विशाल पाटील/ कराड प्रतिनिधी- कराड तालुक्...
पाचवड फाटा नांदलापूर परिसरातील नागरिकांच्यात घबराट
विशाल पाटील/ कराड प्रतिनिधी- कराड तालुक्यातील पाचवड फाट्या नजीक असलेल्या नंदलापूर हद्दतीतल बचपन शाळेच्या जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रं 4 ओलांडताना एका बिबट्यास अज्ञात गाडीने जोराची धडक दिली. वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता, मात्र त्यानंतरही त्याने तिथून धूम ठोकली. बिबट्या पळून जाण्यात यशस्वी झाल्याने परिसरातील स्थानिक लोकांच्यात घबराट निर्माण झाली आहे.
त्यांनी तात्काळ रोहन भाटे यांना माहिती दिली.
बिबट्या महामार्गावर पश्चिमे कडील साईड पट्टी जवळ पडला व त्या जागेवर बसून राहिला.
येणाऱ्या -जाणाऱ्या अनेक जणांनी त्याला पाहिले, तो जोराची धडक बसल्यामुळे बिबट्या बराच वेळ महामार्गाच्या शेजारी बसून होता. घटनास्थळी थोडे बिबट्याचा रक्तस्राव झाल्याचे ही दिसून आले आहे.
बिबट्या जवळपास 15 मिनिटे जागेवर बसून होता.
साधारण 15 मिनिटांनी बिबट्या जागेवरून उठून अतिशय जलद वेगाने महामार्ग क्षणात ओलांडून पूर्वेकडील सर्वहीस रॉड वर येऊन उसाच्या रानात शिरला.
सदर धडक बसलेला बिबट्या महामार्गावर पडलेला असल्याचा फोन तात्काळ घटनास्थळी असलेल्या काही जणांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना केला होता.
भाटे यांनी उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा व वनरक्षक रमेश जाधवर यांना माहिती दिली व घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी पोहचले.
वनरक्षक हे घटनास्थळी पिंजरा घेऊन दाखल झाले.
बिबट्या हा उसाच्या रानात आत शिरला होता,ऊस हा मोठा होता व रात्रीची वेळ असल्याने उसाच्या आत शोध मोहीम राबविणे धोक्याचे व कठीण होते.
सहायक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्याबरोबर चर्चा करून बुधवारी (दि.६) सकाळी लवकर सुरू करण्याची तयारी केली.
त्या प्रमाणे आज सकाळी 7 वाजल्यापासून घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे.
*घटनास्थळी मा वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, वनपाल सवाखंडे,वनरक्षक रमेश जाधवर,प्रशांत मोहिते,उत्तम पांढरे,मंगेश वांजारे,सचिन खंडागळे,पोलीस पाटील शिर्के, व वनमजुर हे शोध घेत आहेत.*