कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस प्रारंभ विशाल पाटील /कराड प्रतिनिधी : कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला ...
कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस प्रारंभ
विशाल पाटील /कराड प्रतिनिधी : कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून पहिल्यांदा जाहीर झालेल्या निकालामध्ये निगडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जय हनुमान पॅनेलने 8 जागा ताब्यात घेत सत्तांतर घडवून आणले आहे.
निगडी येथे लक्ष्मण घोलप व चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान पेनेलने आठ जागेवर बाजी मारली. तसेच सत्तांतरही घडवून आणले. विरोधी पॅनेलचे आत्माराम घोलप यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पुरस्कृत विकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.