अंबाजोगाई (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या आहेत त्यात सर्वात जास्त शिवसेना पक्षाला त्यानंतर भाजप तिसऱ्या क्रम...
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या आहेत त्यात सर्वात जास्त शिवसेना पक्षाला त्यानंतर भाजप तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष गेला अशा बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आंबेजोगाई तालुक्यातही सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या मात्र यापैकी ही ग्रा पं आमच्या पक्षाच्या ,नेत्यांच्या ताब्यात आल्याचा कोणीही दावा केला नाही तो का करण्यात आला नाही हे मात्र अद्याप समजू शकले नाही तालुका पातळीवर राजकीय पक्षाला नेतृत्व नाही असेही नाही असे नसताना राजकीय नेत्यात एवढी अनुत्सुकता का ? असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे
राजकारण विषय हा गल्ली ते दिल्ली सर्वाच्या आवडीचा विषय झाला आहे त्यामुळे प्रत्येकाला यात रस आहे असतो त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बिनविरोध निवडणुका होऊ शकतात ? असा प्रश्न प्रशासनाला पडला मात्र काय करणार जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्यामुळे कोणीही त्यावर कुठलेही भाष्य करू शकत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचे राजकारण जेवढे किचकट नसते तेवढे गावचे राजकारण किचकट असते प्रत्येक गावात दहा गट असतात दहा गटाला एकत्र करून राजकारण कधी चालू शकत नाही त्यामुळे तडजोडीचा प्रस्ताव
गाव पातळीवरून आला तो पार लोकसभा निवडणुकीपर्यंत जाऊन पोहोचला आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तडजोडीचे राजकारण सुरू झाल्याने राजकीय पक्ष ,गटाच्या राजकारणाला दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे गुत्तेदारीच्या व्यवसायात यशस्वी झालेल्या राजकीय नेत्यांनी आता आपल्या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी त्यासोबत राजकीय नेत्यांना गाव माझ्यासोबत आहे हे चित्र दाखवण्यासाठी गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा होत आहे तो कशा पद्धतीने करतात सर्वांनाच ठाऊक आहे
राष्ट्रवादी नेतृत्व विना पोरकी का?
काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशा तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार राज्यात आले त्या माध्यमातून सरकार स्थापन झाले सत्ता स्थापन होऊन वर्ष झाले सत्तेचा फायदा आंबेजोगाई तालुक्याला म्हणावा तसा झाला नाही सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंबेजोगाई तालुक्यातील नेता कोण ? हे आजपावेतो स्पष्ट नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्व विना पोरकी असल्याचे चित्र दिसत आहे दुसरीकडे बीड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी आहेत त्यांनी पक्षाने दिलेल्या संधीचा फायदा होईल तेवढा आंबेजोगाई शहरासाठी वापर केला ते स्वतः जिल्हाध्यक्ष असले तरी आंबेजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व निर्माण ते करू शकले नाहीत ही सत्यता नाकारून चालणार नाही परळी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा चेहरा आहे ग्रामीण भागात प्रमुख कार्यकर्ते आहेत तीच अवस्था भाजपची सुद्धा आहे माजी मंत्री पंकजा ताई मुंडे बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे दोघेही बहिणी चे मुख्यालय परळी आहे त्यामुळे सत्ता बदलामुळे परळी तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरी भाजप संघर्ष करत आहे काँग्रेस पक्षाची त्याही तालुक्यात तीच अवस्था आहे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला नेते तर सोडा जनताही आता स्वीकारायला तयार नाही ही अवस्था आहे चिंतन पक्षनेतृत्वाने करायला हवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी तालुक्यात जेवढा सक्षम आहे तेवढा आंबेजोगाई तालुक्यात का नाही ? हे स्पष्ट दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे माजी आ साठे,असो की उपनगराध्यक्ष लोमटे हे शहरी नेते आहेत शहरा पलीकडे राजकारण ते करत नाहीत ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात अंबेजोगाई तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या त्यापैकी मूर्ती ,केंद्रेवाडी वाकडी, हनुमंतवाडी या गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले अंबलवाडी व दत्तपुर या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत तसेच धावडी ग्रामपंचायतीच्या एकूण सात जागेपैकी चार जागा बिनविरोध तीन जागेसाठी निवडणुका झाल्या आता सातही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत मात्र राज्यात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना यापैकी एकाही पक्षाने पुढे येऊन अंबेजोगाई तालुक्यातील ही ग्रामपंचायत आमच्या पक्षाच्या ,नेत्यांच्या ताब्यात आल्याचा कोणीही अद्याप दावा केला गेला नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन वाघमारे व शहराध्यक्ष गजानन मुंडेगावकर यांनी काही ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेला मानणारे शिवसैनिक ग्रामपंचायतीवर निवडून आल्याचा दावा केला आहे मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे राजकीय नेते मूग गिळून गप्प आहेत पूर्वी आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षाचे नेते मदत करत असत ते निवडणूक जिंकल्यास ते नेते दावा करत होते की आमक्या गावची ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आली आज तसा दावा कोणीच करत नाही राज्य पातळीवर विविध मंत्री आमदारांच्या मतदारसंघात कोणाच्या किती ग्रामपंचायत ताब्यात आल्या याची चर्चा होत असताना आंबेजोगाई तालुक्यात सात ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात कोणीच दावा का करत नाही हाच खरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे