नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहा राज्यांच्या ग्लोबल हाउसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज इंडियाअंतर्...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहा राज्यांच्या ग्लोबल हाउसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज इंडियाअंतर्गत लाइट हाउस प्रकल्पाची भेट दिली. आज नव्या संकल्पांसोबत तीव्र गतीने पुढे जाण्याचा प्रारंभ होत असल्याचे मोदी यांनी या वेळी म्हटले. हे सहा प्रकल्प खरोखरच लाइट हाउस म्हणजेच प्रकाश स्तंभांसारखे आहेत. हे सहा प्रकल्प देशात बांधकाम व्यवसायाला नवी दिशा दाखवतील, असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले, की आज नवी ऊर्जा, नव्या संकल्पांसोबत आणि नवे संकल्प पूर्ण करण्यासाठी तीव्र गतीने पुढे जाण्याचा प्रारंभ होत आहे. आज गरिबांसाठी, मध्यम वर्गासाठी घरे बनवण्यासाठी नवे तंत्रज्ञान मिळत आहे. हा लाइट हाउस प्रकल्प आता देशाच्या काम करण्याच्या पद्धतीचे एक उत्तम उदाहरण आहे. या मागे एक दृष्टीदेखील आहे. एक काळ असा होता, की गृहनिर्माण योजनेला केंद्र सरकारची जितकी प्राथमिकता असायला हवी, तेवढ्या प्रमाणात नव्हती. सरकारला गृहनिर्माणाचे तपशील आणि दर्जा याबाबत माहितीही नव्हती. या नव्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून भारतात 21 व्या शतकातील घरांच्या निर्मितीचे नवे आणि स्वस्त तंत्रज्ञान विकसित केले जाणार असल्याची माहिती मोदी यांनी दिली. हे प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञान आणि इनोव्हेटीव्ह प्रोसेसद्वारे तयार होणार आहेत. बांधकामाचा कालावधीही कमी असेल आणि गरीबांसाठी परवडणारी आणि कम्फर्टेबल घरे याद्वारे तयार केली जातील, असे मोदी म्हणाले.